आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅप्लिकेशन वापरून करा मोबाइलच्या बिलाचा खर्च कमी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा लाड - स्मार्ट फोनच्या जमान्यात ऑनलाइन चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करणे आता सहज सोपे झाले आहे. विशेष म्हणजे मोबाइलमध्ये असलेल्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाइल बिलाचा खर्च देखील कमी करू शकतो. त्याचबरोबर यातील लेटेस्ट फीचर सुविधेचा फायदादेखील घेता येणार आहे.

सद्य:स्थितीत सर्वत्र व्हॉट्स अ‍ॅप, लाइन आणि स्कीपशिवाय अनेक अ‍ॅप्लिकेशन असून, त्याविषयी शहरातील मोबाइल युर्जसमध्ये क्रेझ वाढली आहे.

कारंजा शहरात लेटेस्ट मोबाइल वापरणार्‍या युवकांची संख्या मोठी आहे. कोणताही फोन बाजारात येण्यापूर्र्वी त्याविषयीची मागणी युवावर्गाकडून केली जाते. शहरातील युवावर्ग दरवेळी नवनवीन तंत्रज्ञान असलेल्या मोबाइलच्या शोधात नेहमीच दुकानात विचारपूस करत असल्याचे विक्रेते सांगतात.

सध्या उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्वरुपाच्या अ‍ॅप्लिकेशनमुळे अनेक प्रकारच्या सुविधा युर्जसना मिळू लागल्या आहेत. आता काही अ‍ॅप्लिकेशनमुळे मोबाइलचे बिलही कमी करता येणे शक्य झाले आहे. सध्या या अ‍ॅप्लिकेशनचा वापर युवा वर्गात मोठया प्रमाणात वाढला आहे. चॅटिंग एकाच व्यक्तीसोबत न करता अनेक जणांशी एकाचवेळी करण्याची सुविधा नवीन अ‍ॅप्सने उपलब्ध करून दिली आहे.
एचटीसी 816ला मागणी :
लवकरच बाजारात साडेपाच इंचाची स्क्रीन असलेला एचटीसी 816 मोबाइल हॅण्डसेट, नोट-4, आयफोन-6 हॅण्डसेट येणार आहे. त्यासाठी युवकांकडून विचारणा सुरू झाली आहे. लेटेस्ट तंत्रज्ञान मिळण्यासाठी या मोबाइलला वाढता प्रतिसाद आहे.
वैशिष्ट्ये अशी
टेलिग्राम : एकाचवेळी 200 जणांशी चॅटिंग करण्याची इच्छा असल्यास टेलिग्राम या अँप्लिकेशनद्वारे ते शक्य आहे. विशेष म्हणजे ही अ‍ॅप्स हॅक करता येऊ शकत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ती
महत्त्वाची ठरते.

टांगो : या अ‍ॅप्सद्वारे मेसेजिंग अँप्लिकेशनने त्वरित मेसेज पाठवता येतो. त्याचसोबत व्हिडिओ चॅटिंगची सुविधादेखील मिळते. या अ‍ॅप्सद्वारे मित्रांसोबत ऑनलाइन गेम्सदेखील खेळता येऊ शकतात.

मोगो : व्हिडिओ चॅट फीचरने मनपसंत प्रोफाइल बनवता येतो. यात व्हिडिओ आणि एनिमेटेड वॉलपेपर यासारखे प्रयोगदेखील करता येतात. यात जवळपासच्या मित्रांची माहिती ऑनलाइन
मिळू शकते.

ओवो : या अ‍ॅप्सने 12 जणांशी एकाचवेळी व्हिडिओ चॅटिंग करता येऊ शकते. यात व्हॉइस कॉलदेखील मोफत करता येऊ शकतो.

किक : या अप्सच्या मदतीने मल्टिमीडिया कार्ड सहज पाठवता येते. याच अ‍ॅप्सने मोबाइल युर्जस दुसर्‍या मोबाइलधारकांशी माहिती शेअर करू शकत नाही. याचबरोबर मोबाइल नंबर, फोटो ही पाहू शकत नाही.
अनेकांकडून विचारणा
कारंजा शहरात नवीन तंत्रज्ञानाच्या मोबाइलला लागलीच पसंती मिळते. ‘एचटीसी 816’ या मोबाइलची मागणी आतापासूनच होत आहे. मोबाइल बिल कमी करणार्‍या अ‍ॅप्सचा वापर करणार्‍या युर्जसची संख्या मोठी असून त्यासाठी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जाते.’’
आरीफ पारेख, मोबाइल विक्रेता, कारंजा लाड