आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपले बाळ सुदृढ राहण्यासाठी वेळेवर लसीकरण आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बाळसुदृढ निरोगी राहण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा, असे आवाहन महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज, १८ जानेवारी रोजी श्रीमती कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी उपमहापौर विनोद मापारी, सहायक आयुक्त चंद्रशेखर गुल्हाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांनी बालकांना पोलिओ डोस पाजला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना, डॉ. छाया देशमुख, निर्मला वानखडे, श्रीमती तांबडे, श्रीमती गुंडेकर यांच्यासह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका उपस्थित होत्या. ते वर्षे वयोगटातील एकूण ५७ हजार बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिका क्षेत्रात एकूण २४७ बुथ स्थापन करण्यात आले आहेत.

आठवडाभर पल्स पोलिओ बुथ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयात १९ ते २८ जानेवारीदरम्यान आठवडाभर पोलिओ बुथ लावण्यात येणार आहे. सकाळी ते दुपारी १२ वाजेदरम्यान पोलिओ बुथवर येऊन आपल्या बाळाला पोलिओ डोस पाजा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांनी केले. रविवारी सकाळी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद््घाटन आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे महापालिकेचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर कांबळे, अंकुश गंगाखेडकर, उमेश ताठे, गजानन चव्हाण, रवींद्र नगराळे, क्रिष्णा बारस्कर, मोहम्मद इम्रान, राम पाटील आदी उपस्थित होते.

घरोघरी जाऊनही मोहीम
७७४कर्मचारी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नेमण्यात आले आहेत. १८ मोबाइल टीम १८ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी बालकांना पोलिओ डोस पाजणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य सेवेंतर्गत येणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयात महापालिकेचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या हस्ते कनिष्का पाटेकर या बालिकेला पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, बालरोग तज्ज्ञ डॉ. नारायण साधवाणी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विजया पवनीकर, डॉ. बिपटे, मेट्रन शेवलकर, कलपल्लीवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी मनोगत व्यक्त केले. बाह्यरुग्ण विभागात मोहिमेवर प्रकाश टाकणारी रांगोळी काढली होती.