आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Valentine's Day' Affinity For Young People To Buy

‘व्हॅलेंटाइन डे’साठी सजली शहरातील दुकाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘व्हॅलेंटाइन डे’साठी विविध भेटवस्तूंनी दुकाने सजली आहेत. गिफ्ट आर्टिकल्स, ग्रीटिंग गॅलरीज्मध्ये विविध आकारातील टेडिबेअर, हार्ट शेपमधील कुशन्स आणि अनेक शोभिवंत वस्तू आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. प्रेमसंदेशांचादेखील सजावटीसाठी वापर करण्यात येत आहे.
चॉकलेटची वाढती क्रेझ :
प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट देण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. जोडीदाराला भेटवस्तू म्हणून चॉकलेट देण्याची क्रेझ तरुणाईत आहे. आकर्षक चॉकलेट देण्याकडे त्यांचा कल आहे. हँडमेडसह इम्पोर्टेड चॉकलेटचा यात समावेश आहे. चॉकलेटचे आकर्षक बॉक्स, बुकेदेखील उपलब्ध आहेत. 50 ते 600 रुपयांपर्यंत याचे दर आहेत.
शुभेच्छापत्रांकडे कल :
नेहमीच्या शुभेच्छापत्रांपेक्षा मोठे कार्ड घेण्याकडे तरुणाईचा कल दिसत आहे. व्हॉट्स अँपच्या काळात ग्रीटिंग कार्डचे महत्त्व कमी झालेले नाही. इंग्रजीप्रमाणेच मराठी, हिंदी भाषेतील कार्डला मागणी आहे. काही विनोदी संदेश असलेले कार्डदेखील पसंतीस उतरत आहेत. 50 रुपयांपासून 1,600 रुपयांपर्यंत अनेक कार्ड्सचे पर्याय तरुणांसाठी आहेत.
सॉफ्ट टॉइजला विशेष मागणी
तरुणींना प्रिय असलेले टेडिबेअर, हार्ट शेप कुशन्सला मागणी आहे. विविध आकार व रंगातील टेडिबेअरकडे तरुणांचा कल दिसत आहे. लाल कुशन्सला मागणी असली तरी, गुलाबी कुशन्सदेखील पसंतीस उतरत आहेत. प्रेमसंदेशाच्या कुशन्सलादेखील मागणी आहे. 200 ते आठ हजार रुपयांपर्यंतचे विविध आकारातील कुशन्स व टेडी उपलब्ध आहेत.
आकर्षक भेटवस्तू
तरुणांकडे भेट देण्यासाठी भेटवस्तूंचे पर्याय आहे. प्रेमाचा संदेशाचे कॉफी मग्ज, स्टॅच्यू, फोटोफ्रेमला वेगळा लूक दिला आहे. 200 ते सहा हजारांपर्यंतचे कॉफी मग उपलब्ध असून, 2,500 रुपयांपर्यंतच्या फोटोफ्रेमच्या डिझाइन आहेत. टेडिबेअर, गुलाबाप्रमाणे कपल स्टॅच्यूचे प्रकार 200 ते दोन हजारांपर्यंत आहेत. लव्ह पझल ही भेटवस्तूसाठी पर्याय आहे. मंद संगीताचे गिफ्ट पसंतीस उतरत आहे. 300 ते 500 रुपयांपर्यंतच्या कोटेशन बुकलादेखील मागणी आहे.