आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूल्यवर्धित कर विवरणपत्र भरण्याचे आवाहान, अन्यथा करदात्यांवर कठोर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - व्यापारी करदात्यांना विक्रीकर विवरणपत्रे भरणे आवश्यक आहे. ज्या करदात्यांनी विक्रीकर (मूल्यवर्धित कर) विवरणपत्रे भरलेली नाहीत, अशांना प्रलंबित विवरणपत्रे दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट 2013 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आह़े या मुदतीतही विवरणपत्रे दाखल न करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात येणार आह़े

मुळात विक्रीकराची विवरणपत्रे भरण्यासाठी विभागाने मुदत निश्चित केली आह़े त्यानुसार, मासिक विवरणपत्र दाखल करणार्‍यांना विवरणपत्र कालावधीच्या पुढील महिन्याच्या 21 तारखेपूर्वी, तर त्रैमासिक विवरणपत्र दाखल करणार्‍यांना विवरणपत्र कालावधीच्या पुढील महिन्याच्या 21 तारखेपूर्वी आणि सहामाही विवरणपत्र कालावधीच्या पुढील महिन्याच्या 30 तारीख किंवा त्यापूर्वी दाखल करणे बंधनकारक असत़े मात्र, ज्या करदात्यांना काही कारणास्तव त्यांच्या विक्रीकराचे विवरणपत्रे भरणे मुदतीत शक्य झालेले नाही, त्यांच्याकरिता 31 ऑगस्ट 2013 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, या मुदतीतही अनेक करदाते विवरणपत्र सादर करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती आहे. अशा करदात्यांवर विक्रीकर विभागाकडून कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे कसूरदार करदात्यांनी विवरणपत्र भरून कारवाई टाळावी, असे आवाहन विक्रीकर विभागाने केले आह़े


अशी होणार कारवाई
करदात्यांना मूल्यवर्धित कराचे विवरणपत्रे भरणे गरजेचे आहे. त्यासाठी विशिष्ट मुदतही देण्यात आली आहे. या मुदतीत अनेक करदात्यांनी विवरणपत्र सादर न केल्याने 31 ऑगस्ट 2़013 पर्यंत विवरणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. या अंतिम मुदतीत विवरणपत्र सादर न करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. या कारवाईत बँक खाते गोठवणे, ऋणको, मालमत्ता गोठवण्यासारख्या कारवाईचा समावेश आह़े.

31 ऑगस्टपर्यंत मुदत
व्यापारी करदात्यांकडून विक्री कर मोठय़ा प्रमाणात भरण्यात येतो. मूल्यवर्धित कराच्या माध्यमातून विक्री कर विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तरी विक्री कर चुकवणार्‍यांचेही प्रमाण मोठे आहे. विक्री कर भरण्यार्‍या सर्व करदात्यांना विवरणपत्रे भरणे आवश्यक असून, मुदतीत विवरणपत्रे सादर न करू शकणार्‍यांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.