आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदिक यांच्या पुतळ्याचे शिवसैनिकांनी केले दहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पत्रकार वेदप्रताप वेदिक यांच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदच्या भेटीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत शिवसेनेच्या वतीने 16 जुलैला दुपारी वेदिक यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. बसस्थानकासमोरील हुतात्मा धिंग्रा चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, शहरप्रमुख तरुण बगेरे यांच्या नेतृत्वात वेदप्रताप वेदिक यांच्या पुतळ्याचे दहन करून शिवसैनिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच वेदिक यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत नारेबाजी केली. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, भारतीयांचा अत्यंत संवेदनशील विषय आहे, त्यामुळे कुणीही काश्मीरविषयी आपले व्यक्तिगत मत जाहीररीत्या व्यक्त करणे योग्य नाही, असे करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी या वेळी केली.

आंदोलनात उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ भालतिलक, तालुकाप्रमुख मुकेश मुरुमकार, संतोष अनासने, जिल्हा सचिव धनंजय गावंडे, अतुल पवनीकर, शहर उपप्रमुख किरण ठाकूर, बंटी काकड, नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक विनोद मापारी, राजकुमारी मिश्रा, देवश्री ठाकरे, अरुण परोडकर, गोपाल दातकर, सुरेश सोळंके, दिनू सुरशे, सतीश मानकर, मनोज बाविस्कर, योगेश अग्रवाल, प्रकाश वानखडे, मुन्ना मिश्रा, सुनील डुकरे, निखील नालट, गजानन चव्हाण, शिव बगेरे, राजू खुडाणिया, अविनाश कोकरे, पिंटू गावंडे, टिल्लू शुक्ला, महेश वाघ आदींसह शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.