आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाज्यांचे दर वाढल्याने बिघडली फोडणीची चव; बजेट गडबडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खाद्यतेलाच्याकिमती कमी झाल्या, परंतु भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. पावसाच्या लहरीपणाचा पिकांवर जसा परिणाम झाला, त्याच प्रमाणे भाजीपाल्यावरदेखील झालेला आहे. अकोला बाजारात गेल्या काही दिवसांत भाज्यांची आवक कमी प्रमाणात असल्यामुळे दर वाढले आहेत. सध्या बटाट्यांचे भाव चांगलेच वाढले आहे.
खाद्यतेलाच्या भावामध्ये सध्या घसरण झालेली आहे. सोयाबीन तेल ठाेकमध्ये ६३ ते ७० रुपये, तर घाऊक बाजारात ७२ रुपये किलो, फल्ली तेल ठोक बाजारात ९४ रुपये, तर घाऊकमध्ये १०० रुपये किलो, खोबरेल तेल सुटे १६० रुपये किलो, तर पॅकिंगमधील विविध कंपन्यांच्या तेलाची २०० ते २५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. खोबऱ्याच्या वाढीव दरामुळे तेलही महाग आहे. सध्याच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे भाव त्याच पातळीवर आहेत. सोने-चांदीच्या दराप्रमाणे तेलाचे भावदेखील दररोज बदलत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार दर ठरत असल्याने दर स्थिर राहत नाही. भाज्यांना पर्याय डाळींचा असतो, परंतु सध्या डाळीही महाग आहेत. मूग तर यंदा हातचा गेल्यामुळे बाजारात मुगाची आवकच झाली नाही. उडदाचेही कमीअधिक प्रमाणात तसेच झालेले आहे. शेतकऱ्यांच्या आशा सोयाबीनवर होत्या, परंतु सोयाबीनचा उताराही समाधानकारक दिसत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यामुळे गृहिणींचा कल भाजीवर असतो. अकोला बाजारात कोथिंबीर नांदेड, लातूर भागातून येते. हर्राशीमध्ये कोथिंबीरचा भाव ५०-७० रुपये किलो असतो आणि किरकोळ बाजारातही तोच भाव राहतो. वांगी, बरबटी, गवार, टोमॅटो नगर, रिसोड, मालेगाव येथून येतात. बटाटे राजस्थान, आंध्र प्रदेशातून येतात. तर, कांदे नाशिक भागातून येतात. रविवारी बाजारात भाज्यांचे दर चांगलेच वाढलेले दिसले. किरकोळ विक्रीवरही त्याचा परिणाम दिसून आला.
टोमॅटो आणि पत्ताकोबीच फक्त २० रुपये किलो आहे. तीच ती भाजी खाऊनही कंटाळा येतो. आणि भाजी बदलावी तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ठोक आणि किरकोळ बाजारातील भावामध्ये १० ते २० रुपये किलोचा फरक पडत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाट्यांचे दर ३० ते ४० रुपये किलोदरम्यान आहेत, तर हाच भाव किरकोळ बाजारातही आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे व्यवहार घाट्याचे असले तरी मंदी असल्याने नाईलाज आहे.
आवक कमी
बाजारातसध्या भाज्यांची आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत. देशाच्या अन्य भागातून भाज्या आल्या तरच भावावर नियंत्रण राहू शकते. महादेवराव मसने,भाजीविक्रेते
ग्राहकांचा नाईलाज
जीवनावश्यकवस्तू असल्याने ग्राहकांचाही नाईलाज होतो. बाजारावर नजर टाकली असता खरेदीवर नेहमीच्या तुलनेत फरक झालेला दिसत आहे. सैयद अमीन,ठोकभाजी विक्रेता
बजेट विस्कळीत झाले

महिन्याचेबजेट बसवणे तारेवरची कसरत झालेली आहे. कांदे, बटाट्याचेही दर वाढलेले असल्यामुळे गृहिणींसाठी चिंतेचा विषय आहे. रोजचाच संघर्ष होऊन बसला आहे. अनिता सुरेशपाटील, गृहिणी