आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली, भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- फळांचे भाव वाढले, तरी विशेष फरक पडत नाही. परंतु, भाजी तर दररोज लागणारी गरज आहे. भाजीला पर्याय डाळींचा असू शकतो. परंतु, डाळीही स्वस्त नाहीत. त्यामुळे पहिली पसंती असते ती भाजीला. सध्या बाजारात भाज्यांचे दर अस्मानाशी स्पर्धा करू पाहत आहेत. पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली आहे. परिणामी, गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
अकोला बाजारात नाशिक येथून भाज्या येतात. पुण्याजवळच्या मंचरहून फूलकोबी, पानकोबी, बुलडाणा येथून मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक तर वाडेगाव येथून लिंबू, कांदा येतो. नाशिक येथील गाड्या पहाटे अकोल्याला पोहोचतात. त्यानंतर हर्राशी होऊन माल विक्रीसाठी काढला जातो. गेल्या दोन-तीन दिवसांपासून भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. पावसाचा अनियमितपणा हेच त्याला कारण आहे. वेळीच पाऊस आला असता, तर भाज्यांची चणचण भासली नसती, असे विक्रेत्यांचे मत आहे. बाजारात चांगली आवक होऊ लागली, तरच भाज्यांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे, असे मत भाजी विक्रेते प्रकाश धनोकार यांनी व्यक्त केले.