आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन अपघातात दोन होतकरू तरुणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-वाशिम बायपास नाक्याजवळ 407 मेटॅडोर आणि इंडिका कारचा गुरुवार, 6 मार्चला पहाटे 5.30 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात मेटॅडोरचालकासह तरुण मजुराचा मृत्यू झाला. दोघेही मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील रहिवासी होते.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथून चोहोट्टा बाजार येथे एम.एच.30 ई-5409 क्रमांकाचा 407 मेटॅडोर वीटभट्टीसाठी गोवर्‍या घेऊन जात होता. वाशिम जिल्ह्यातील देगाव येथील भावना पब्लिक स्कूलचे दोन कर्मचारी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे शाळेच्या कामानिमित्त एम.एच. 29 आर 1622 या इंडिका कारने जात होते. ही दोन्ही वाहने गुरुवारी पहाटे वाशिम बायपास नाक्यावर धडकली. जोरदार धडकेमुळे मेटॅडोर उलटून चालक सागर संजय नवत्रे (25) आणि त्याच्या बाजूला बसलेला गोपाल सीताराम गवळी (20) रा. देऊळगाव साकर्शा हे दोघेही जागीच ठार झाले. इंडिका कारचा चालक संतोष वाळके, रा. रिसोड, शाळेतील कर्मचारी गणेश किसन भांदुर्गे (30) रा. शिरपूर जैन , संतोष माणिकराव अवचार (32) रा. रिसोड, हे तीन कर्मचारी जखमी झाले. त्यांना तत्काळ येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंडिकाचा चालक संतोष वाळके आणि संतोष अवचार यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सकाळी 9 वाजता खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
इंडिका कार खासदार भावना गवळी यांच्या संस्थेची
वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची देगाव येथे भावना पब्लिक स्कूल आहे. देगाव येथील शाळेत अमरावती जिल्ह्यातील धारणीचे काही विद्यार्थी शिकतात. धारणी येथे दर महिन्याला येथील कर्मचारी जातात. बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हे दोघे कर्मचारी इंडिका कारने देगावहून धारणीला जाण्यासाठी निघाले. रिसोड-पातूर-अकोला-अकोट-धारणी असा त्यांचा प्रवास होता. रात्री पाऊस आल्यामुळे त्यांनी पातूर येथे मुक्काम केला. पहाट पाचला ते पातूरहून निघाले होते, अशी माहिती इंडिका कारच्या काचेवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, अन्सार यांनी दिली. आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयात संस्थेच्या कामासाठी जात असताना हा अपघात झाला, अशी माहिती अपघातात जखमी झालेले गणेश भांदुर्गे यांनी दिली. दरम्यान, मेटॅडोरचालक सागर हा नेहमीच चोहोट्टा बाजार येथे गोवर्‍या विक्रीसाठी आणायचा. धारणी येथे दर महिन्याला येथील कर्मचारी जातात. बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हे दोघे कर्मचारी इंडिका कारने देगावहून धारणीला जाण्यासाठी निघाले. रिसोड-पातूर-अकोला-अकोट-धारणी असा त्यांचा प्रवास होता. रात्री पाऊस आल्यामुळे त्यांनी पातूर येथे मुक्काम केला. पहाट 5 वाजता ते पातूरहून निघाले होते, अशी माहिती इंडिका कारच्या काचेवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, अन्सार यांनी दिली. आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयात संस्थेच्या कामासाठी जात असताना हा अपघात झाला, अशी माहिती अपघातात जखमी झालेले गणेश भांदुर्गे यांनी दिली.
नेहमीच चोहोट्टय़ाला जायचे
मेटॅडोरचालक सागर हा नेहमीच चोहोट्टा बाजार येथे गोवर्‍या विक्रीसाठी आणायचा. मेहकर तालुक्यामधून मजुरांनी गोळा केलेल्या गोवर्‍या तो विकत घ्यायचा आणि त्या विक्री करायचा.