आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भामध्ये १३ हजार कि.मी. रस्त्यांचा अनुशेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्यातील अन्य विभागाच्या तुलनेत विदर्भातील ११ जिल्ह्यांत १२ हजार ४५१ किलोमीटरचे रस्ते निर्मितीची अद्यापही गरज आहे. भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात १७ हजार ८९१ किलोमीटरचे अधिक रस्ते तयार केले आहेत. या तुलनेत मराठवाड्यातील ५,४४० किलोमीटर, तर विदर्भात १२ हजार ४५१ किलोमीटरच्या रस्त्यांचा अनुशेष शिल्लक आहे.
त्यामुळे राज्यातील इतर भागाच्या बरोबरीने विदर्भाचा रस्ते विकास करण्यासाठी जिल्हावार आराखड्यात जास्त लांबीच्या रस्त्यांचा समावेश करावा लागेल, असे विदर्भ विकास मंडळाच्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. तीनही विभागाच्या तुलनेत विदर्भातील रस्त्यांची लांबी अद्यापही कमी असल्याने विदर्भात रस्ते निर्मितीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी शिफारस विदर्भ विकास मंडळाने अहवालात केली आहे. रस्ते निर्मितीचा हा अनुशेष भरून काढावयाचा असेल तर विदर्भाला कोट्यवधी रुपयांच्या निधीची आणखी गरज आहे. त्यामुळे रस्त्यांचा अनुशेष दूर करायला राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही शिफारस अहवालात केली आहे.
२००१ ते २०२१ रस्ते विकास आराखडा
विभागजिल्ह्यांचे क्षेत्रफळ मंजूर रस्ते अपेक्षित लांबी कमी-अधिक
उर्वरित महाराष्ट्र १,४५,४७५ १,७७,२२२ १,५९,३३१ १७९८१(+)
मराठवाडा ६४,८०६ ६५,५३१ ७०,९७१ ५४४०(-)
विदर्भ ९७,४०९ ९४,२४१ १,०६,६९२ १२,४५१(-)
दृष्टिक्षेपात
किलोमीटरच्या रस्त्यांचा अनुशेष आहे विदर्भात शिल्लक.
किलोमीटर, रस्त्यांचा मराठवाड्यातील अनुशेष आहे शिल्लक.
किलोमीटरचे रस्ते निर्मितीची ११ जिल्ह्यांत अद्यापही गरज आहे.

जिल्हावार रस्ते विकास योजना करावी
राज्यातीलरस्ते विकासाकरिता केंद्र शासनाच्या अंतर्गत भारतीय रस्ते अनुसंधान आणि इंडियन रोड काँग्रेस यांच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यानुसार प्रत्येक राज्याला २० वर्षांची जिल्हावार रस्ते विकास योजना तयार करावी लागते. यात प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, बारमाही रस्त्याने जोडणारे भाग आणि ग्रामीण रस्ते विकास यांचा समावेश वीस वर्षीय आराखड्यात करण्यात येतो. १९८१ ते २००१ च्या रस्ते विकास आराखड्यात प्रस्तावित केलेल्या रस्ते निर्मितीच्या तुलनेत विदर्भात १७ हजार ९२१ किलोमीटरचे रस्ते निर्माणच केले नाही. त्यामुळे रस्त्यांचा अनुशेष वाढला, तर २००१ ते २०२१ या आराखड्यात विदर्भात मंजूर केलेली रस्त्यांची लांबी १२ हजार ४५१ किलोमीटरने कमी केली आहे. मागील ३५ वर्षांतील रस्ते विकासाची तुलना केली तर विदर्भात १३ हजार ५९७ किलोमीटर रस्त्यांची निर्मितीचा समावेश आराखड्यात करावा लागणार आहे. याकरिता ७,१३८ कोटी रुपयांची गरज पडेल, असेही अहवालात म्हटले आहे.