आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून आर्णी येथे विदर्भ साहित्य संमेलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी (जि. यवतमाळ) - आर्णी नगर परिषद, नागरी आयोजन समिती आणि विदर्भ साहित्य संघ आर्णी शाखा यांच्या वतीने आयोजित 63 वे विदर्भ साहित्य संमेलन शुक्रवारपासून आर्णी येथे सुरू होत आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या या संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते होणार आहे. आर्णीच्या वसंतराव नाईक साहित्यनगरीत रसिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

तीन दिवसीय साहित्य संमेलनात एकूण 11 सत्र होणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी जाणार आहे. दुपारी 2 वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते होईल. या वेळी संमेलनाध्यक्ष वर्‍हाडी कवी शंकर बडे, स्वागताध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आमदार अमित देशमुख, साहित्यिक सुरेश द्वादशीवार, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, पूर्वाध्यक्ष डॉ. किशोर सानप, प्रा. नारायण कुळकर्णी (कवठेकर) उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्राचार्य प्रभाकर कामतकर यांच्या जटायू, सुमन मनवर यांच्या संदेश-आंबेडकरी काव्यसंग्रह आणि विशेष पवार यांच्या गीतांजली पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.

सायंकाळी राजा बढे स्मृती कविसंमेलन होणार आहे. बबन सराडकर अध्यक्षस्थानी राहतील. कविसंमेलनात ज्ञानेश वाकुडकर, कलिमखान, अशोक थोरात, राजा धर्माधिकारी, क्रांती साडेकर, रेशा अकोटकर, अनंत नांदुरकर, उषाकिरण आत्राम, प्रसेनजित गायकवाड, मीराताई ठाकरे, रूपेश देशमुख, ललित सोनोने, मसूद पटेल, शुभदा मुंजे, अमित वाघ, तुळशीदास खराटे, आबेद शेख, संजय शिंगलवार, प्रा. रवी चापके, सिद्धार्थ भगत, विष्णू सोळंके, हेमंत कांबळे, गजेश तोंडरे, प्रतिभा देशमुख, प्रा. विलास भवरे, अनुपमा मुंजे, बळवंत भोयर, उमेशचंद्र सरोदया, मनोज माहुरे सहभागी होणार आहेत. अजीम नवाज राही सूत्रसंचालन करतील. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी ‘वर्‍हाडी बोलीचे मानकरी’ या विषयावर मुक्त चिंतन होईल. यात डॉ. विठ्ठल वाघ मार्गदर्शन करतील.

दुपारी 12 वाजता शरद पिदडी यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलन होईल. यात डॉ. अजय चिकाटे, नीलकृष्ण देशपांडे, किरणकुमार मडावी, देवेंद्र तातोडे, दीपक आसेगावकर, नितीन देशमुख, प्रकाश अनंतवार, साधना सुरकर, भाग्यश्री पेटकर, मयूरा देशमुख, सुरेश पाचकवडे, गजानन वाघमारे, दिनकर वानखडे, दीपक रंगारी, नितीन नायगावकर, जयश्री दाणी, अलका दुधबुरे, ज्ञानेश्वर वांढरे, शोभा कदम, सुनीता झाडे, नूरजहाँ पठाण, पुरुषोत्तम गावंडे, ज्योत्स्ना कदम, विजय मारोतकर, सुमती वानखडे, वनमाला भालेराव, विजय ढाले, माधव चुकेवाड, नाना बनसोड, नरेश रामटेके, गिरीधर कुबडे, अनंत बावणे, क. वि. नगराळे, ह.सू. भगत, प्रशांत वंजारे सहभागी होतील. सूत्रसंचालन सुरेश गांजरे करतील. दुपारी 3 वाजता साहित्याची भूमिका आणि शेतकर्‍यांचे प्रश्न या विषयावर परिसंवाद होईल. चंद्रकांत वानखडे अध्यक्षस्थानी राहतील. विजय जावंधिया, डॉ. उत्तम रुद्रवार, डॉ. अशोक पळवेकर, अनंता भोयर, गजानन अहमदाबादकर, नयना धवड, प्रा. डॉ. देवेंद्र पुनसे, पुरुषोत्तम गावंडे सहभागी होतील.

प्रा. शांतरक्षित गावंडे सूत्रसंचालन करतील. सायंकाळी अंधर्शद्धा निर्मूलन-विचारवंतांची भूमिका या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. श्याम मानव अध्यक्षस्थानी राहतील. यात शिवराय कुळकर्णी, वैशाली गोडबोले, प्रा. शंकरराव सांगळे, प्रा. संध्या पवार, प्रा. किशोर बुटले सहभागी होतील. रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत झोळी हा नाट्यप्रयोग तसेच प्रा. अंकुश गिरी, अश्वत्थामा हा एकपात्री प्रयोग सादर होईल. 23 फेब्रुवारीला चार सत्र होतील. त्याचबरोबर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, नाणे प्रदर्शन व वेगवेगळ्या प्रजातींच्या 400 वृक्षांची प्रदर्शनी एकाच दालनात पाहायला मिळणार आहे, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक विर्शामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेला जितेन्द्र मोघे, आरीज बेग, राजेश कुशवाह, राजेश माहेश्वरी, अतुल देशमुख उपस्थित होते.