आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidarbha Yatri Movement Demand To Special Some Railway Issue At Akola

विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-उन्हाळ्याच्या सुट्या तसेच विवाह समारंभाची तिथी दाट असल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष गाड्या चालवण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन विदर्भ यात्री संघाद्वारे दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांना देण्यात आले.
लग्न समारंभ व उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे प्रवाशांची गर्दी उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा रेल्वे प्रशासनाने हैदराबाद ते मुंबई सेंट्रल व्हाया नांदेड ते लखनऊ, नांदेड ते हरिद्वार, नांदेड ते वाराणसी, नांदेड ते ओखा, नांदेड ते मुंबई सेंटर, सिकंदराबाद ते जयपूर, व्हाया पूर्णा अकोला तसेच अकोला ते कोलम, अकोला ते रामेश्वरम, यशवंतपूर ते इंदूर आदी गाड्या चालवाव्यात, या आशयाचे निवेदन विदर्भ यात्री संघाच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक प्रदीप कुमार श्रीवास्तव यांना देण्यात आले. या निवेदनाच्या प्रति मुख्य वाणिज्य प्रबंधक भरत भूषण, सी.पी.टी.एम. जॉन, नांदेड मंडळ रेल्वे प्रबंधक पी.सी.शर्मा, वरिष्ठ डी.टी.एम. मिर्शा आदींना देण्यात आले. निवेदन देतेवेळी विदर्भ यात्री संघाचे अध्यक्ष डॉ. रवी के. आलिमचंदानी, अशोक अग्रवाल, दीप मनवानी, अँड.शरद मिर्शा, खंडेलवाल, डॉ. कुलकर्णी, डॉ. गद्रे उपस्थित होते, अशी माहिती पत्रकाद्वारे कळवण्यात आली.