आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vidhan Parishad Opposition Leader Vinod Tawde Attack On Home Minister R. R.Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एवढा लाड असेल तर पवारांनी आबांना मांडीवर बसवायला हवे, तावडे यांचा हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - महाराष्ट्रात गुन्हेगारीचा आलेख सातत्याने चढत असताना आर. आर. पाटील लाडके असल्याचे शरद पवार सांगतात. आर. आर. पाटलांचा एवढाच लाड असेल, तर शरद पवारांनी त्यांना मांडीवर बसवावे. आमच्या माथी कशाला असे गृहमंत्री देता, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला.

तावडे यांनी मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय मुडे, माजी आमदार रामदास तडस, मिलिंद भेंडे उपस्थित होते. या वेळी त्यांनी देवळी तालुक्यातील शिरपूर, कोल्हापूर शिवारातील काही शेतांची पाहणी करून शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वध्र्यातील विर्शामगृहात झालेल्या पत्रपरिषदेत तावडे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्राला एवढे नाकर्ते गृहमंत्री मिळाले आहेत. तोंडपाटीलकी करून कायदा आणि सुव्यवस्था राखणे होत नाही. गृह खाते सांभाळण्यात पाटील सक्षम नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचा हवाई दौरा नौटंकी

मागील तीन दिवसांपासून मी विदर्भ दौर्‍यावर असून, माझा हा दौरा अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या काही तासांच्या विदर्भ दौर्‍यात काय पाहिले असेल, हा प्रo्नच आहे. त्यांचा दौरा नौटंकी होता. सरकारने मर्यादित सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. जेवढे नुकसान झाले, त्यापेक्षा कमी नुकसान दाखवा, जास्त मदत देता येणार नाही, असे सरकारचे तोंडी आदेश असल्याचे तावडे म्हणालेत.

सावकारविरोधी विधेयक पारित करा

राज्य सरकारने पाठवलेल्या सावकारविरोधी विधेयकात केंद्राच्या गृह विभागाने 11 त्रुट्या काढल्या आहेत. पण, अद्यापही या त्रुट्या दुरुस्त न केल्याने वारंवार हे विधेयक राज्याकडे परत येत आहे. येत्या नागपूर अधिवेशनात हे विधेयक दुरुस्तीसह पारित करून घ्यावे, असेही सरकारला सुनावले.

पीक कर्ज माफ करावे

सरकारची मदत तुटपुंजी आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करावे, हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी आणि एका महिन्याच्या आत ही रक्कम शेतकर्‍यांना द्यावी. नव्या सीलिंग कायद्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. या कायद्याला भाजपचा विरोध राहील, असे तावडेंनी स्पष्ट केले.