आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilas Deshmukh News In Marathi, Research, Divya Marathi

आता जगाशी शेअर करा तुमचेही संशोधन, अकोल्याच्या अश्विन भोसलेची किमया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आता जगभरातील संशोधकांना वेबसाइटवर आपले संशोधन, शोधनिबंध एकमेकांशी शेअर करता येईल. ही किमया घडवली आहे शिवाजी महाविद्यालयातील बायोटेक्नोलॉजीचा विद्यार्थी अश्विन भोसलेने.

अश्विनने संशोधनात्मक विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधी स्वत:चा ब्लॉग सुरू केला. पहिल्याच महिन्यात जगभरातून एक हजारांवर हिट्स मिळाल्या. मग, त्याने गुगलद्वारे वेब डिझाइनिंगचे धडे गिरवले आणि वेबसाइट डिझाइन केली. सध्या संशोधनावर भर देणारी वेबसाइट नसल्याने त्याने संशोधनाला प्राधान्य दिले. winspage.org या वेबसाइटवर आता जगभरातील सर्व शास्त्रज्ञ आपले संशोधन, शोधनिबंध शेअर करू शकतील. 15 ऑगस्ट 2013 ला वेबसाइट सुरू झाली.w.gridया अ‍ॅप्लिकेशनद्वारे जगभरातील विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, संशोधन संस्थांना आपले संशोधन ऑनलाइन उपलब्ध करता येईल. वेबसाइटसाठी ‘एईएस’चा (अमेरिकन इनक्रिप्शन स्टँडर्ड) वापर केल्याने संशोधन, माहितीची चोरी करणे शक्य होणार नाही. प्रत्येकाचा ई-मेल आयडी व पासवर्ड सुरक्षित राहील. यासाठी अश्विनला नागपूरची सुगंधा बेतावार व अकोल्याच्या अक्षय सपकाळ या मित्रांची मदत मिळाली.

मायक्रोसॉफ्टतर्फे अश्विनचे अभिनंदन
अश्विनने वेबसाइटसाठी मायक्रोसॉफ्ट डेव्हलपर्स नेटवर्ककडे दोन महिन्यांपूर्वी नोंदणी केली. त्यांनी संपूर्ण माहिती, चाचण्या घेऊन या वेबसाइटला मान्यता प्रदान केल्याचे पत्राद्वारे कळवले. ही वेबसाइट मायक्रोसॉफ्टच्या ट्रू१ङ्म२ङ्मा३ इ्र९स्रं१‘ या वेबसाइटचा भाग बनल्याबद्दल त्याचे अभिनंदनही करण्यात आले.

पुस्तकी शिक्षण नको, ठोस संशोधन हवे
अलीकडे शिक्षण केवळ डिग्रीपुरते, डिग्री ही नोकरीसाठी अन् नोकरी ही पैशांसाठी केली जाते. त्यामुळे तरुणवर्ग आणि त्यांचे पालकही बक्कळ पैसा मिळणा-या क्षेत्रांवर अधिक भर देतात. मला केवळ पुस्तकी शिक्षण नको आहे, म्हणून माझा सुरुवातीपासून ठोस संशोधनाकडे कल आहे. अश्विन भोसले,
शिवाजी महाविद्यालय, अकोला.