आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voter Awareness Campaign,latest News In Divya Marathi

जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, मतदार जागृती अभियानात मुख्‍यध्‍यापक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मतदानाचीटक्केवारी वाढावी, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. लहान मुलांनी परिवारातील सदस्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. आपल्या घरात किती मतदार आहेत, त्यांची यादी करण्याचा गृहपाठ विद्यार्थ्यांना दिल्यास फायदा होऊ शकतो. मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी प्रमोद देशमुख यांनी केले. बुधवारी रालतो विज्ञान महाविद्यालयात झालेल्या मतदार जागृती अभियान कार्यशाळेत त्यांनी मतदार जागृतीविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे महाविद्यालयात मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी प्रमोद देशमुख यांनी मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांचा कसा उपयोग होऊ शकतो, हे स्पष्ट केले. मुख्याध्यापक- शिक्षक-विद्यार्थी-पालक अशी साखळी तयार करून निवडणूकसंबंधी माहिती मतदारांपर्यंत लवकर पोहोचवता येते. हे एक प्रभावी माध्यम अाहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय निवडणूक नियंत्रण यंत्रणा या विषयावर परदेशातील अनेक संशोधकांचे शोधनिबंध अाहेत. लोकशाहीत मतदानाला असलेले महत्त्व सर्वांना समजावे आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा, असे मत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक सोनवणे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या वतीने ऑक्टोबरपासून मतदार जागृती अभियान सुरू आहे. प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांनी त्यासंबंधीचा आढावा घेतला. शिवाय महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी किमान दहा मतदारांना मतदानासाठी केंद्रावर घेऊन जाण्याचा संकल्प रासेयोच्या स्वयंसेवकांनी घेतला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात मानवी साखळी तयार करून मतदान करण्याची जनजागृती केली. या वेळी त्यांनी विविध घोषणा दिल्या. कार्यशाळेत अकोला शहर, अकोला ग्रामीण, मूर्तिजापूर, बार्शिटाकळी येथील जवळपास २५० मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले. आभार गटशिक्षणाधिकारी अश्विन मानकर यांनी मानले. या वेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधीर कोहचाळे, डॉ. आशीष सरप, डॉ. अंजली ठाकरे, कॉलेज इलेक्शन अॅम्बेसेडर स्वप्निल मेसरे आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे महाविद्यालयात मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.