आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voters Now Wait 16 May 2114 Issue At Akola, Divya Marathi

उमेदवारांसह मतदारांना आता 16 मेची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता गुरुवारी 10 एप्रिल रोजी घेतलेल्या निवडणुकीचा निकाल 16 मे रोजी जाहीर होणार आहे. या निकालाची उमेदवारासह मतदारांना प्रतीक्षा लागली आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघ (क्रमांक 6) करिता झालेल्या निवडणुकीत सात उमेदवारांचे नशीब सीलबंद झाले आहे. जिल्ह्यातील 6 मतदारसंघांमध्ये सरासरी एकूण 58.53 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत या निवडणुकीत 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले. लोकसभेसाठी भानुदास कांबळे (बसप), संजय धोत्रे (भाजप), हिदायतउल्ला पटेल (काँग्रेस), अजय हिंगणकर (आप), अँड. प्रकाश आंबेडकर (भारिप-बमसं), शेख हमीद इमाम (बहुजन मुक्ती पार्टी), संदीप वानखेडे (अपक्ष) या उमेदवारांनी निवडणूक लढवली. गुरुवारी 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार असल्याने आणखी एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
निवडणूक सामग्री सीलबंद : लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी वापरलेली सर्व सामग्री जिल्हाधिकारी कार्यालयातील एका सभागृहात शुक्रवारी, 11 एप्रिल रोजी सीलबंद करून ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या सभागृहाचा दरवाजासुद्धा सीलबंद करण्यात आला आहे.

रिसोड पोटनिवडणुकीची मतमोजणी अकोल्यात
अकोला मतदारसंघात येणार्‍या पण वाशिम जिल्हय़ात असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गुरुवारी, 10 एप्रिल रोजी झाली. या निवडणुकीचा निकालही 16 मे रोजी अकोला येथे जाहीर होणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.