आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vudavula Grass Demand For The Cooler, Divya Marathi

कूलरच्या ताट्यांसाठी वूडवूलची मागणी वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरात वाढत असलेल्या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी अकोलेकर तयारीला लागले आहेत. घरात, कार्यालयात थंड हवेसाठी कूलर बाहेर काढण्यात आले आहेत. थंड हवेसाठी कूलरमध्ये नवीन ताट्या बसवण्याचे काम जोमाने सुरू झाले असून, कूलरच्या ताट्यांमध्ये वापरण्यात येणार्‍या वूडवूलची मागणी वाढली आहे.
उन्हाळ्यात उकाड्यापासून बचाव करण्यासाठी बाजारात फायबर कूलर आले असले, तरी पत्र्याच्या कूलरचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कूलरचे ताट्या बनवण्याचे काम सुरू होते. पण, या वर्षी महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या गारपीट, पावसामुळे हे काम महिनाअखेरीला सुरू झाले. शहरात उकाड्यात वाढ होत आहे, तसे शहरात मोठय़ा प्रमाणात कूलरचे काम होत आहे.
कूलरच्या ताट्या देवदार लाकडापासून वूडवूल बनवण्यात येतात. हे वूडवूल नागपूर आणि दिल्लीवरून आणले जाते. शहरात ठिकठिकाणी वूडवूलचे ढीग आणि तयार ताट्या पाहायला मिळत आहे. एका किलो वूडवूलची किंमत 40 रुपये असून, कूलरची तयार ताटी जवळपास 130 रुपयांची आहे. याशिवाय घराच्या दाराला लावण्यात येणार्‍या चटईचे दर 250 रुपये आहे. ताट्यांच्या आकाराप्रमाणे त्याची किंमत ठरवली आहे. एका मोठय़ा आकाराच्या कूलरमध्ये साडेतीन ते चार किलो वूडवूलचा वापर केला जातो.
साधी दिसणारी ही ताटी बनवायला दोन ते अडीच तास लागतात. जुन्या पत्र्याच्या कूलरची ताटी बनवण्यासाठी वूडवूलसोबतच कापडाच्या जाळीचा वापर केला जातो, तर डेझर्ट कूलरची ताटी बनवताना तारेच्या जाळीचा वापर केला जातो. तयार मिळणारी ताटी बनवताना आधी त्याचा ढाचा तयार केला जातो आणि नंतर त्यात वूडवूल टाकून त्याची बांधणी केली जाते.