आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vultures News In Marathi, Wildlife, Environment, Divya Marathi

इजिप्शियन, राजा गिधाडांवर अस्तित्त्वाचे ओढवले संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आपल्या पर्यावरणात सफाई कामगाराची भूमिका बजावणार्‍या गिधांडावर आधीच संकट असताना आणखी दोन जातींवर संकट ओढवल्याचे केंब्रिज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून समोर आले आहे. भारतीय उपखंडातील गिधाडांच्या नऊ प्रजातींपैकी तीन प्रजाती यापूर्वीच नामशेष होण्याच्या मार्गावर असताना आता इजिप्शियन गिधाड व राजा गिधाडही संकटग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
भारतीय उपखंडात आढळणार्‍या नऊ गिधाड प्रजातींपैकी पांढर्‍या पाठीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड तसेच पातळ चोचीचे गिधाड या प्रजाती 99 टक्के नष्ट झाल्याचे यापूर्वीच्या संशोधनातून समोर आले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) तसेच रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स (आरएसपीबी) या संस्थेच्या संशोधकांनी एप्रिल 2014 मध्ये केंब्रिज र्जनलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनातून आता इजिप्शियन गिधाड व राजा गिधाड (रेड हेडेड व्हल्चर) या प्रजातीही संकटात सापडल्याचा निष्कर्ष काढला आहे. इजिप्शियन गिधाड 80 टक्के तर राजा गिधाड 91 टक्के नष्ट झाल्याचे संशोधनात मांडण्यात आले आहे. पशुवैद्यक वेदनाशामक औषध डायक्लोफेनॅकमुळे हे संकट ओढवले आहे. उत्तर भारतातील संरक्षित क्षेत्रात तसेच रस्त्यालगत 1992 ते 2011 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात या बाबी आढळल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाने 2006 मध्येच डायक्लोफेनॅक या वेदनाशामकावर प्रतिबंध लावला आहे. काही प्रमाणात गिधाडांवरचे संकट टळले असले, तरी छुप्या मार्गाने सुरू असलेला डायक्लोफेनॅकचा वापर अद्याप थांबलेला नाही.
गिधाडांच्या जोडीचे दर्शन
तीन वर्षांपूर्वी 8 फेब्रुवारी 2011 रोजी अकोला शहराजवळ असलेल्या कुंभारी तलाव परिसरातील खदान भागात इजिप्शियन गिधाडांची जोडी आढळली होती. मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र तेलकर, वन्यजीव छायाचित्रकार विलास देशमुख यांनी त्याचे छायाचित्र टिपून वन, वन्यजीव विभागाला त्याची माहिती दिली होती. तीन दिवस परिसरात त्यांचा मुक्काम होता. मात्र, नंतर मागमूस लागला नाही.