आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाई प्रकल्पाच्या कामामध्ये भूसंपादनाचीच अडचण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यपालांच्या यादीतील वाई संग्राहक तलावाची घळभरणी जून २०१६ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, अद्यापही १३६ हेक्टर भूसंपादन रखडले असल्याने एक वर्षाच्या काळात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणे अवघड असल्याने वाई प्रकल्पाच्या पूर्णत्वास भूसंपादन अडचणीचा मुद्दा ठरला आहे.

मूर्तिजापूर तालुक्यात वाई संग्राहक तलावाचे काम सुरू आहे. ९२ कोटी ५७ लाख रुपयांच्या या प्रकल्पात ५.०५ दशलक्षघनमीटर जलसाठा उपलब्ध होणार असून, एक हजार ३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाणार आहे. या प्रकल्पामुळे २४२ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार आहे, तर सुलतानपूर या गावाचे पूर्णत: पुनर्वसन करावे लागणार आहे. पुनर्वसनासाठी भूसंपादन झालेले आहे. परंतु, प्रकल्पातील बुडीत क्षेत्रापैकी केवळ १०६ हेक्टर जमीन ताब्यात घेतलेली आहे. प्रकल्पाचे काम ६० टक्के झालेले आहे.

अद्याप १३६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रखडले आहे. भूसंपादनाचा नवा कायदा अद्यापही अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे भूसंपादन कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे जून २०१६ अखेरपर्यंत प्रकल्पाची घळभरणी कशी करावी? असा प्रश्न अधिकार्‍यांसमोर निर्माण झाला आहे. हा प्रकल्प राज्यपालांच्या यादीतील प्रकल्प असल्याने या प्रकल्पाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

एकीकडे भूसंपादन रखडलेले असताना दुसरीकडे खरप नवले येथील ४.६५ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी ताब्यात घेतली असली, तरी या जागेत नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी अद्यापही अंदाजपत्रक मंजूर झालेले नाही. नागरी सुविधांंच्या कामांपैकी पाणीपुरवठा योजनेचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेकडे सोपवण्यात आले असून, विद्युत खांब उभारण्याचे काम विदर्भ जल विद्युत उपसा सिंचन विभागाकडे सोपवण्यात आले आहे. ही कामेही अत्यंत संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे जून २०१६ पर्यंत या प्रकल्पाची घळभरणी अशक्य असल्याचे बोलले जाते.मूर्तिजापूर तालुक्यात वाई संग्राहक तलावाचे काम सुरू आहे. ९२ कोटी ५७ लाख रुपयांच्या या प्रकल्पात ५.०५ दशलक्षघनमीटर जलसाठा उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा शेतकर्‍यांना हाेणार असून ३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाणार आहे.