आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे पोलिसांच्या गालावर मारले ब्लेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रेल्वेस्थानकावर गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसाला रेल्वेमध्ये दोन जण संशयितरीत्या फिरताना दिसून आले. त्यांना हटकले असता त्यांनी पोलिसांच्या गालावर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली.
रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल संजय बाबुसिंग चव्हाण हे शुक्रवारी दुपारी रेल्वे फलाटावर गस्तीवर होते. या वेळी पुण्याकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस फलाट क्रमांक वर उभी रािहली असता या गाडीमध्ये दोन जण चव्हाण यांना संशयितरीत्या फिरताना आढळून आले. या दोघांना हटकले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर चव्हाण यांनी या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी अनिल रताळ वय २४ याने त्याच्या खिशातील ब्लेड काढले आणि चव्हाण यांच्या तोंडावर मारले. चव्हाण यांच्या गालावर ब्लेड लागल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले होते.
दरम्यान, चव्हाण यांच्यावर वार करून अनिल रताळ आणि इंदासखान अफरोजखान वय १८ हे दोघे पळायला लागले. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या इतर पोलिस कर्मचारी आणि आरपीएफचे जवानांनी या दोन्ही आरोपींचा पाठलाग केला त्यांना पकडले. या दोघांविरुद्ध पोलिसांनी भादंवि ३२४, ३५३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही आरोपींना उद्या शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...