आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंचा पुतण्या हरिश साळवेच्या विरोधात वॉरंट, लगेच अंतिरिम जामीनही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामात अपहार केल्याप्रकरणातील आरोपी हरीश खडसेंविराेधात कनिष्ठ व सत्र न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वाॅरंट जारी केले हाेते. मात्र, न्यायालयाने शुक्रवारी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हरीश खडसे हे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे आहेत.

हरीश यांनी अकोट बाजार समितीच्या बांधकाम कामात ८० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर यांनी अकोट पोलिसांत दिली होती. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी बाजार समितीचे सभापती रमेश हिंगणकर, तत्कालीन सचिव मोहसीन बेग मिर्झा, कंत्राटदार सुनील अग्रवाल आणि आर्किटेक्ट हरीश खडसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी हिंगणकर, मिर्झा व अग्रवाल यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला हाेता. मात्र, हरीश खडसेंनी जामीन घेतला नव्हता. याप्रकरणी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार हिंगणकर, मिर्झा व अग्रवाल यांना जामीन मंजूर केला. मात्र, हरीश गुरुवारीसुद्धा न्यायालयात गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.