आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीपट्टीचे 47 हजार रुपये गेले तरी कुठे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोटफैल भागातील नागरिकांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली जमा केलेला सुमारे 47 हजार रुपयांचा निधी महापालिकेत जमाच झाला नाही. या प्रकरणाची जलप्रदाय विभागाने चौकशी सुरू केली आहे. पाणीपट्टीच्या नावाखाली जमा झालेला हा निधी नेमका गेला कुठे ?, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

या प्रकरणातील निधीचा अपहार हा वसुलीकर्ता व कुली पदावर कार्यरत असलेल्या मारोती शेंडे यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर विभागाने चौकशीअंती ठेवला, अशी माहिती मिळाली आहे. नागरिकांकडून पाणीपट्टीची वसुली झाल्यानंतर त्या पाणीपट्टीचा भरणा नियमितपणे करण्याची गरज आहे. पण, असे करण्यात महापालिकेचे काही कर्मचारी कानाडोळा करतात. याचा फायदा जलप्रदाय विभागातील मारोती शेंडे यांनी घेतला. त्यांनी अकोट फाइल भागातून पाणीपट्टीच्या नावाखाली सुमारे 47 हजार रुपये जमा केले. पण, या निधीचा भरणा केला नाही. त्यामुळे निधीचा अपहार झाल्याचा संशय महापालिकेतील अधिकार्‍यांना आला. चौकशीअंती मारोती शेंडे यांनी हा अपहार केल्याचे आढळल्याचे मत जलप्रदाय विभागाचे प्रमुख नंदलाल मेर्शाम यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात शेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. तसा प्रस्ताव पाठविल्याची माहिती मेर्शाम यांनी दिली. हा अपहार मोठा नसून, त्याचा भरणा त्या कर्मचार्‍याकडून करण्यात येईल, असे ही ते म्हणाले.