आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपट्टी वसुलीसाठी आता अभिकर्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाणीपुरवठा योजनेला सुरळीत करण्यासाठी पाणीपट्टी वसुलीसाठी अभिकर्ता नियुक्त करण्याच्या निर्णयासह महानगरासाठी फायदेशीर असणार्‍या विविध विषयांना २१ ऑगस्टला मनपाच्या महासभेत मंजुरी दिली. तर अनधिकृत बांधकाम प्रकरणांमध्ये हार्डशिप व कंपाउंडिंग शुल्क आकारण्याचे प्रस्ताव पेंिडंग ठेवण्यात आले.
सभेत एकूण २१ विषयांचा समावेश होता. सभा प्रारंभ होण्यापूर्वी विविध भागातील नगरसेवकांनी विविध कंपन्यांच्या वतीने टाकण्यात येणार्‍या केबल वायरमुळे फुटणार्‍या जलवाहिन्यांचे प्रमाण अधिक वाढल्याने केबल वायर टाकण्याचे काम बंद करण्याची मागणी केली तसेच साफसफाईची कामे आणि पाणीपुरवठ्याबाबत गजानन गवई, काझी नाजिमोद्दीन, सतीश ढगे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तर गणेश मूर्ती विक्रीची दुकाने एकाच ठिकाणी लावणे शक्य नसल्याने झोननहिाय गणेश मूर्तीची विक्री करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेता हरीश आलिमचंदानी, संजय बडोणे, आनंद बलोदे, अजय शर्मा, श्रीमती मंजूषा शेळके, विजय अग्रवाल आदींनी केली. ही मागणी प्रशासनाने मान्य केली.
मनपा क्षेत्रात ऑटो डीसीआर लागू करण्याच्या विषयावर नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. परिणामी, आयुक्त डाॅ. महेंद्र कल्याणकर यांनी हा प्रस्ताव पेंडिंग ठेवावा, पुढील सभेत सर्वसमावेशक माहिती असलेली टिप्पणी दिली जाईल. मात्र, ऑटो डीसीआर लागू करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यासोबत मनपा क्षेत्रात उपद्रव करणार्‍या नागरिक व व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई, पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने जलशुद्धीकरण केंद्रात दोन पंप खरेदी करणे, मनपा क्षेत्रात अतिरिक्त प्रकाश योजना गणपती उत्सवानंतर केवळ जिल्हािधकार्‍यांकडून सूचना आल्यानंतरच मनपातर्फे लावणे, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत क्षेत्रनहिाय कचरा उचलणे, पडीक वाॅर्डातील साफसफाईसाठी पाच कंत्राटी मजुरांना मुदतवाढ देणे, १५ कोटींतील रस्त्यांच्या निवदिा, बीओटी तत्त्वावर सुलभ शौचालय, मालमत्तांचे सर्वेक्षण जीआयएस पद्धतीने करणे, आदी विषय मंजूर करण्यात आले. तर वृत्त लिहीपर्यंत सभेचे कामकाज सुरूच होते.
तरीही विधानसभेसाठी आहेत इच्छुक
महासभेत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असताना साजीद खान, अब्दुल जब्बार, उषा विरक, मदन भरगड, राजेश्वरी अम्मा, जया गेडाम, कोकीळा डाबेराव, कल्पना गावंडे, गोपी ठाकरे, करुणा इंगळे, रहिमाबी अब्दुल्ला खान हे नगरसेवक सभेला अनुपस्थित होते. यापैकी अनेक नगरसेवक विधासभेसाठी इच्छुक आहेत. तर विधानसभेसाठी इच्छुक असलेले आणि सभागृहात उपस्थि्त असलेल्या नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी सभेत अजून तोंडही उघडले नाही.
स्थायी समिती नसल्याचा परिणाम
दीड वर्षांपासून मनपात स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे लहानसहान विषयांवरही महासभेत चर्चा करावी लागते. २१ ऑगस्टला झालेल्या सभेतही यामुळे विषयपत्रिकेवरील विषयांना प्रारंभ होण्यास विलंब झाला. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील विविध समस्या महासभेत मांडल्या.
स्वच्छतेबाबत जनजागृती करा
प्रत्येक प्रभागात दररोज कचरा निर्माण होतो. हा कचरा उचलण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, प्रभागातील नागरिकच हा कचरा निर्माण करतात. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवकांनी स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी केले.
नगरसेवक म्हणतात
बिनपगारी फुल अधिकारी
मनपात गठित केलेली हाय पॉवर कमिटी केवळ मीटिंग घेण्यापुरतीच आहे. ही कमिटी म्हणजे बनिपगारी फुल अधिकारी, यासारखी आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करण्यात यावी.
सुमनताई गावंडे.
क्षेत्रीय अधिकारी मातीचा पेंड
पश्चिम झोनचे क्षेत्रीय अधिकारी कामाचे नाहीत. अधिकारी पदावर कसे पोहोचले? हे अधिकारी म्हणजे मातीचा पेंड ठरले आहेत. एखाद्यावेळी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल.
काझी नाजिमोद्दीन
गटनेत्यांवर विश्वास नाही का?
आयुक्त डाॅ. कल्याणकर यांनी महासभेपूर्वी गटनेत्यांची बैठक घेणे सुरू केले आहे. गटनेता हा त्या गटाचा प्रमुख असतो. या नात्यानेच आयुक्तांनी ही पद्धत सुरू केली. परंतु, अशी बैठक घेऊनही जर सभेत नगरसेवकांचे एकमत नसणे म्हणजे गटनेत्यांवर विश्वास नसण्यासारखे आहे. असे असेल तर आयुक्तांना सांगा, म्हणजे या पद्धतीत बदल करता येईल.
सुनील मेश्राम
सन्मानाने वागवा
प्रशासनाकडून स्लम भागातून निवडून आलेल्या नगरसेवकांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही. ज्येष्ठ नगरसेवकांनी आम्हीही नगरसेवकच आहोत, याची जाणीव महापािलका प्रशासनाला करून द्यावी.
शरद तुरकर
चुकीचा संदेश नकाे
प्रशासनाचे विषय पेंडिंग ठेवल्यानंतर हे विषय किती महत्त्वाचे होते, ही बाब स्पष्ट करताना प्रशासनाची स्तुती करा. मात्र, या स्तुतीतून या प्रस्तावांना नगरसेवकांचा विरोध होता, असा संदेश जातो. ही बाब लक्षात घेऊन वक्तव्य करावे.
प्रतुल हातवळणे