आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Dam Construction Pending Due To Land Acquisition In Akola

नवीन भूसंपादन कायद्याच्या कचाट्यात अडकले जलप्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्याच्या कचाट्यात जिल्ह्यातील जल प्रकल्प अडकले आहेत. भूसंपादनासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी लागते. परंतु, अद्याप प्रशासकाची नियुक्तीच केल्याने भूसंपादनाचे काम रखडले आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती झाल्याशिवाय भूसंपादन होणार नाही आणि भूसंपादनाशिवाय प्रकल्पाच्या कामाला गती येणार नाही.
जिल्ह्यातील नया अंदुरा या प्रकल्पामुळे मौजे अंत्री, मलकापूर, मौैजे उरळ, उरळ खुर्द, उमा बॅरेजमुळे पोही, रोहणा, लंघापूर या गावांचे पूर्णत: तर कुठे अंशत: असे या गावठाणांचे पुनर्वसन होत आहे. भूसंपादनाचे प्रस्ताव मार्च २०११ मध्येच सादर होऊन संयुक्त मोजणीची कार्यवाही जून २०१२ मध्ये पूर्ण झालेली आहे.
शासनाच्या धोरणाप्रमाणे पुनर्वसन आराखड्याला मंजुरी घ्यावी लागते. ही मंजुरी चार वर्षांनंतर मिळाली आहे. पुनर्वसन होणाऱ्या गावठाणांच्या संपादनासाठी राज्य शासनाने प्रशासकाची नियुक्ती केल्याशिवाय हे भूसंपादन होऊ शकत नाही. नवीन कायद्यातील कलम-११ ची (जुन्या कायद्याची कलम-४) प्रसिद्धी करता येत नाही.
परिणामी, चार वर्षांपासून घरे, गावठाण क्षेत्र संपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासनाचे प्रशासकाच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जोपर्यंत शासन प्रशासकांची नियुक्ती करणार नाही, तोपर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे हे सर्व प्रकल्प नवीन भूसंपादनाच्या कचाट्यात अडकले आहेत.

विशेष म्हणजे, प्रशासकाच्या नियुक्तीनंतरही ही कार्यवाही होणार असल्याने अनेक वर्षे प्रकल्पाचे काम खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, किमती वाढतील, शेतकऱ्यांना सिंचनाच्या लाभापासून वंचित राहावे लागेल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पग्रस्तांना घराचा मोबदला मिळण्यास विलंब होणार आहे, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, तर वाई संग्राहक तलावाची घळभरणी जून -२०१६ मध्ये प्रस्तावित आहे. परंतु, प्रकल्पाकरिता लागणारी २३५ हेक्टर जमीन अद्यापही संपादित झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम खोळंबणार आहे. दुसरीकडे नागपूर खंडपीठाने गुणांकाबाबत दिलेल्या निर्णयामुळे अंतिम निवड्याची प्रक्रिया मंदावली आहे. नव्या भूसंपादनाबाबत वेगवेगळे मत व्यक्त केले जात अाहे.

गुंता कधी सुटेल
जिल्ह्यातीलप्रकल्प मात्र या नवीन भूसंपादनामुळे रखडले आहेत. हा गुंता केव्हा सुटेल? याबाबत लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भूसंपादनाशिवाय कामाला गती येणार नाही.