आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे आदर्श व्यवस्थापन देऊ शकते शेतकऱ्यांना आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गतकाही वर्षांतील पावसाचा विस्कळीतपणा पिकांना मारक ठरत आहे. पावसाचे तंत्र बिघडले की, त्याचा परिणाम शेतीवर होतो. त्यामुळे पाऊस किती पडला, यापेक्षा तो कसा पडला, हेच शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पावसाचा सखोल अभ्यास होणे यापुढे आत्यंतिक गरजेचे राहणार आहे. पावसाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्याशिवाय गत्यंतर नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
यंदाच्या पावसाने तर शेतकऱ्यांचे गणित बिघडवले आहे. जुलैमध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे खरिपाची पेरणी उशिरा झाली. मात्र, पाऊस एकसारखा नव्हता. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर झाला. खरीप पीक गेले. त्यानंतर रब्बी पिकांनीही शेतकऱ्यांना दगा दिला. हरभरा, तूर ही पिके हाती येण्याची शक्यता दिसत असताना गेल्या दोन तीन दिवसांतील पावसाने त्या आशेवर पाणी फेरले आहे. शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीकडे पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

गेल्या चार वर्षांत पावसाचे तंत्र कसे बदलत आहे. त्याचा पिकांवर कसा परिणाम होत आहे, याबाबत तज्ज्ञांनी विश्लेषण केले आहे. २०१०-११ मध्ये अकोला जिल्ह्यात १००८ मिमी पाऊस झाला. १४२ तासांपैकी ते १० मिमी प्रती तास वेगाने ३१० मिमी पाऊस १२० तासांत झाला. १० ते २० मिमी प्रती तास वेगाने १६० मिमी पाऊस १० तासांत झाला. २० ते ३० मिमी प्रती तास वेगाने १११ मिमी पाऊस साडेचार तासांत झाला. ३० ते ४० मिमी प्रती तास वेगाने ६७ मिमी पाऊस पावणे दोन तासांत झाला. ४० ते ५० प्रती तास वेगाने ८८ मिमी पाऊस दोन तासांत, ५० ते ६० प्रती तास वेगाने ६९ मिमी पाऊस तास १४ मिनिटांत, ६० ते १०० मिमी प्रती तास वेगाने ७८ मिमी पाऊस एका तासात झाला. २०११-१२ मध्ये ४४७ मिमी पाऊस झाला. यांपैकी ते १० मिमी प्रती तास वेगाने १७२ मिमी पाऊस ८६ तासांत, १० ते २० मिमी प्रती तास वेगाने ७१ मिमी पाऊस साडेपाच तासांत, २० ते ३० मिमी प्रती तास वेगाने ५० मिमी पाऊस दोन तासांत, ३० ते ४० मिमी प्रती तास वेगाने २४ मिमी पाऊस ४१ मिनिटांत, ४० ते ५० मिमी प्रती तास वेगाने २३. मिमी पाऊस ४७ मिनिटांत, ५० ते ६० मिमी प्रती तास वेगाने ५२.५ मिमी पाऊस तास मिनिटांत, ६० ते १०० मिमीप्रती तास वेगाने ४०.६ मिमी पाऊस ३० मिनिटांत, तर १०० मिमी प्रती तास वेगाने १२.७ मिमी पाऊस मिनिटांत झाला होता.
२०१२-१३ मध्ये ६१२.९ मिमी पाऊस झाला. ते १० मिमी प्रती तास वेगाने ३३३.४ मिमी पाऊस १५१ तास ११ मिनिटांत झाला. १० ते २० मिमी प्रती तास वेगाने १०४ मिमी पाऊस तास ४४ मिनिटांत झाला. २० ते ३० मिमी प्रती तास वेगाने ५८.७ मिमी पाऊस तास १५ मिनिटांत झाला. ३० ते ४० मिमी प्रती तास वेगाने ३४ मिमी पाऊस तास मिनिटांत झाला. ४० ते ५० मिमी प्रती तास वेगाने २०.४ मिमी पाऊस ३० मिनिटांत झाला. ५० ते ६० मिमी प्रती तास वेगाने २९.५ मिमी पाऊस ३० मिनिटांत झाला. ६० ते १०० मिमीपेक्षा जास्त वेगाने १९ मिमी पाऊस १० मिनिटांत झाला.

२०१३-१४ मध्ये एकूण ७७४. मिमी पाऊस झाला. त्यात ते १० प्रती तास मिमी वेगाने ४३८ मिमी पाऊस १७५ तास ४० मिनिटांत, १० ते २० मिमी प्रती तास वेगाने ९८ मिमी पाऊस तास ४३ मिनिटांत, २० ते ३० मिमी प्रती तास वेगाने ६४.७ मिमी पाऊस तास ४३ मिनिटांत, ३० ते ४० मिमी प्रती तास वेगाने २६.६ मिमी पाऊस ४२ मिनिटांत, ४० ते ५० मिमी प्रती तास वेगाने ३८.८ मिमी पाऊस ५० मिनिटे, ५० ते ६० मिमी प्रती तास वेगाने २२ मिमी पाऊस २२ मिनिटांत, ६० ते १०० मिमी प्रती तास वेगाने ५४.९ मिमी पाऊस ४० मिनिटांत, तर १०० मिमीपेक्षा जास्त वेगाने ३१ मिमी पाऊस १७ मिनिटात झाला.

पावसाचा विस्कळीतपणा पिकांना ठरतोय मारक
पाऊस पडण्याचा कालावधी, वेग विसंगत आहे. तीव्रतेने पडणारा पाऊस पूर्वी ऑगस्टमध्ये व्हायचा आता तो जुलैमध्येच पडत आहे. त्यामुळे मातीची धूप होण्याचे प्रमाण जास्त आहे. कमी वेळात जास्त पाऊस झाला की, त्याचा शेतीला लाभ होत नाही.
शेतीतील आदर्श आराखड्याचे अवलंबन आवश्यक
पावसाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतीतील आदर्श आराखड्याचे अवलंबन आवश्यक आहे. पावसातील विस्कळीतपणा आेळखून साजेशा उपाययोजना तळागाळात पोहोचत नाही तोवर कोरडवाहू शेती शाश्वत होऊ शकत नाही. यासंदर्भात डॉ. पंदेकृविने मूलस्थानी जलव्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे नियोजन याविषयी केलेले प्रयोग यशस्वी ठरले आहेत. '' डॉ. सुभाषटाले, विभागप्रमुख,मृद जलसंधारण अभियांत्रिकी, डॉ. पंदेकृवि, अकोला