आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Project May Be Problematic News In Marathi

काटकसर न केल्‍यास टंचाईच्‍या झळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातीलएकूण जल प्रकल्पात १८९.०९ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. एकूण साठवण क्षमतेच्या ५७.०४ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने उन्हाळ्यात जिल्ह्याच्या विविध भागात पाणीटंचाई उद््भवण्याची शक्यता अाहे. दोन मोठे, तीन मध्यम, ३२ लघू प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणी साठवण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. या जल प्रकल्पांमुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि औद्योगिक वसाहतीला उद्योगासाठी पाणी दिले जाते. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत हे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु, या वर्षी पाऊस कमी झाल्याने प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध झाला आहे. खारपाणपट्ट्यासारख्या भागाला आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांना पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असला तरी पाचव्या दिवशी पाच दिवसांचा एकूण पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांमध्येच नागरिकांना दरडोई किती पाणीपुरवठा होतो, याबाबत एकमत नाही. एका अधिकाऱ्याच्या मते ९० लीटर, तर याच विभागातील दुसऱ्या अधिकाऱ्याच्या मते १०० लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.
तूर्तास महिन्याकाठी १.६९ दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली जात आहे. ही उचल कायम ठेवल्यास काटेपूर्णा प्रकल्पातून १४.३६ दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली जाईल, तर शहरासाठी १५ जुलै २०१५ पर्यंत १४.४५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडल्यास १.६९ पेक्षा अधिक पाण्याची उचल केली जाईल.
दरडोई पाणीपुरवठ्याबाबत संभ्रम असला तरी प्रकल्पातून महिन्याकाठी उचलीच्या हिशोबानुसार दरडोई ११२ लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. नोव्हेंबरमध्ये काटेपूर्णातून १.६९ दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केल्या गेली. रोज ०.०५६ दलघमी. म्हणजेच कोटी ६० लाख लीटर. पाच लाख लोकांना पाणीपुरवठा करण्याचा दावा मनपा करते. त्यानुसार पाच लाख नागरिकांना कोटी ६० लाख लीटर पाणी म्हणजेच प्रती व्यक्तीस ११२ लीटर पाणी दिले जात आहे.