आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी पायपीट , भौरद पाणीपुरवठा योजना अडकली लालफीतशाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अडीचकोटी रुपये खर्च करून भौरद पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले असताना केवळ काही क्षुल्लक तांत्रिक मंजुरीसाठी लालफीतशाहीत अडकल्याने २५ हजार नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. २००८ ला सुरू झालेल्या या योजनेचा लाभ नागरिकांना अद्यापही घेता आलेला नाही.

महापालिकेच्या पश्चिम क्षेत्रालगत गेल्या काही वर्षांत उभी झालेली उपनगरे भौरद ग्रामपंचायत क्षेत्रात येतात. हा भाग खारपाणपट्ट्यालगत येतो. त्यामुळे जममिनतील पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
ही बाब लक्षात घेऊन भौरद ग्रामपंचायतीने २००८ ला भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना सुरू केली. अडीच कोटी रुपये खर्चाच्या योजनेत भौरद ग्रामपंचायतीला दहा टक्के लोकवर्गणी द्यावी लागली. मार्च २००८ ला मंजूर झालेल्या या योजनेच्या कामास प्रत्यक्ष मे २००८ ला प्रारंभ झाला. साडेसहा लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ पाण्याने भरून तयार आहे. तीन झोनमध्ये जलवाहनि्याही अंथरण्यात आल्या आहेत. तीनपैकी एका झोनमध्ये ट्रायलही घेण्यात आली. हे तनि्ही झोन जोडण्यासाठी शेगावकडे जाणारा मुख्य रस्ता फोडावा लागणार आहे, तर रेल्वे रुळाच्या खालून जलवाहनिी न्यावी लागणार आहे. या दोन्ही विभागांकडे जलवािहनी टाकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सात वर्षांपासून या भागातील नागरिक केवळ पाणी केव्हा मिळणार, याची वाट पाहत आहेत. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

नागरिककरताहेत केवळ प्रतीक्षा : २००८ला सुरू झालेल्या या योजनेचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक गल्लीतून जलवाहिनी गेली आहे. दारासमोरून जलवाहीनी गेलेली असताना तसेच महाकाय जलकुंभ डोळ्यासमोर दिसत असतानाही नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
मनपालासहन करावा लागतो भार : महापानिल केनेडिमांड दिली नसली तरी भौरद ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व नागरिक गोड्या पाण्यासाठी जुन्या शहरातील शिवनगर, हरिहरपेठ या भागातील जलकुंभावरून पाणी नेतात. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी देण्याचा भार महापालिकेला उचलावा लागत आहे.

पाणीटंचाईमुळे शक्यता कमी
मनपाने डिमांड दिली नाही यायोजनेसाठी महापालिकेच्या शिवनगर भागातील जलकुंभातून पाणी घेतले जाणार आहे. दररोज साडेसहा लाख लिटर पाणी देण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला आहे. परंतु, अद्याप मनपाने डिमांड दिलेली नाही.
वाढीव सुधारित मान्यता कळीचा मुद्दा दोनकोटी ५० लाख रुपयांची योजना मंजूर झाली असली, तरी योजना पूर्ण करण्यासाठी ३३ लाख रुपये अधिक लागणार आहे. या वाढीव खर्चाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

भौरदला पाणी देणे अशक्यप्राय बाब आहे. तसेही महासभेने केलेल्या करारनाम्यात एक वर्षाची बँक गॅरंटी भौरद ग्रामपंचायत मनपाला देईल तसेच दर महनि्याला पाण्याचे देयक द्यावे लागेल.'' अजयगुजर, शहरअभियंता, मनपा.
दिवाळीपर्यंत योजना कार्यान्वित होईल
योजनेचेकाम जवळपास पूर्ण झाले आहे. ३३ लाखांच्या वाढीव योजनेलाही मंजुरी मिळेल, तर तीन झोनला जोडण्याचे कामही केले जाईल. त्यामुळे ही योजना दिवाळीपर्यंत कार्यान्वित होईल.''डॉ..सुभाष लवाळे, अध्यक्ष,भौरद पाणीपुरवठा समिती