आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Purification Center,latest News In Divya Marathi

पाणीपुरवठा पूर्वपदावर, खंडित पाणीपुरवठ्याची टांगती तलवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महानयेथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन पंप दुरुस्त झाले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर आला आहे. मात्र, अद्यापही तीन पंप तसेच पॅनेल दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. त्यामुळे खंडित पाणीपुरवठ्याची टांगती तलवार कायम आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील पंप अनुक्रमे आणि ऑक्टोबरला शॉर्ट सर्किटमुळे नादुरुस्त झाले.त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला होता. विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने पंप दुरुस्तीने काम युद्धपातळीवर सुरू केले. जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांचे लाइफ संपल्याने हे पंप सातत्याने नादुरुस्त होत आहेत. जलशुद्धीकरण केंद्रातील पाचपैकी केवळ दोन पंप सुरू आहेत, तर उर्वरित तीन पंप बंद आहेत तसेच शॉर्ट सर्किटमुळे पॅनेल जळाले आहे. त्यामुळे दोन पंप सुरू झाल्याने पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात पूर्वपदावर आला आहे. परंतु, सुरू असलेल्या दोन पंपांपैकी एक पंप नादुरुस्त झाल्यास पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो.
दहा लाख रुपये खर्च
महानजलशुद्धीकरण केंद्रातील तीन पंपांची दुरुस्ती, पॅनेल दुरुस्ती, मोटार रिवाइंडिंग आदी कामे करावी लागणार आहे. यासाठी किमान दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.