आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Purification Centre Lot Problem News In Marathi

एक लाखासाठी ३५ जणांचा जीव धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जलशुद्धीकरण केंद्रात सहा महिन्यांत दोन वेळा आग लागल्याच्या घटना घडल्यानंतरही आगरोधक यंत्रणा उभारण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. केवळ एक लाख रुपयांच्या खर्चासाठी तब्बल ३५ कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे, तर दुसरीकडे कोट्यवधी साहित्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महान येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण आठ पंप आहेत. यांपैकी तीन पंप सुरू आहेत. जलशुद्धीकरण केंद्राला ४४० व्होल्टचा विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच आगरोधक यंत्रणा उभारणे गरजेचे होते. तशी यंत्रणा जलशुद्धीकरण केंद्रात उपलब्ध होती. परंतु, सहा महिन्यांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानंतर आगरोधक सिलिंडर वापरून आग आटोक्यात आणली गेली. परंतु, केंद्रातील पॅनेल जळून खाक झाले. त्यानंतर पुन्हा एकदा केबल जळण्याची घटना घडली. परंतु, ही आग त्वरित आटोक्यात आणल्या गेली.
पाणीअसूनही फायदा नाही : जलशुद्धीकरणकेंद्रात केवळ शाॅर्टसर्किटमुळे आग लागू शकते. जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ११ केव्हीची विद्युत वाहिनी आलेली आहे. महापालिकेच्या स्वत:च्या रोहित्रातून ११ केव्हीला ४४० व्होल्टमध्ये परिवर्तीत करण्यात आले आहे. त्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास प्रारंभीच पाण्याचा मारा करता येत नाही. प्रथम रासायनिक पावडर, फोम, सीओ-२ या सिलिंडरचा वापर करून आग आटोक्यात आणावी लागते. त्यानंतर पाण्याचा फवारा करावा लागतो.
केवळएक लाख रुपयांचा खर्च : मागच्यावेळी आगरोधक सिलिडंरचा उपयोग झाला. त्यामुळे हे सिलिंडर पुन्हा भरून ठेवणे अथवा नवीन विकत घेणे गरजेचे आहे. सिलिंडर पुन्हा भरून घेतल्यास २० ते ३० हजार रुपये खर्च येतो, तर नवीन उपाययोजना केल्यास एक लाख रुपये खर्च आहे.
प्रस्ताव पाठवला नाही
-मानसेवीकर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे प्रस्ताव तयार करण्याचे काम रखडले आहे.'' सुनीलकाळे, कार्यकारीअभियंता,
प्रस्ताव नाही
-आगलागल्यास उपाययोजना तपासणीसाठी प्रस्ताव आलेला नाही, असा प्रस्ताव अाल्यास केंद्राची तपासणी करून कोणते साहित्य वापरावे, याची माहिती देऊ.'' रमेशठाकरे, अग्निशमनअधिकारी,