आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११ लघू प्रकल्पांमध्ये मृतसाठ्याची पातळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने मे महिन्यातच जिल्ह्यातील ३२ लघू प्रकल्पांपैकी ११ लघू प्रकल्पांनी मृतसाठ्याची पातळी गाठली आहे, तर काही लघू प्रकल्प मृतसाठ्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातही केवळ १२ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पावसाने विलंब केल्यास शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाई उद््भवू शकते.

जिल्ह्यात एक मोठा, तीन मध्यम आणि ३२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची तसेच जनावरांच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. याच बरोबर औद्योगिक वसाहतीलाही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत या जलप्रकल्पांची भूमिका महत्त्वाची आहे. जलप्रकल्पांत मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्यास रब्बी हंगामात कोट्यवधीची उलाढाल होते, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघतो. मात्र, मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी निर्गुणा प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांत क्षमतेच्या ५० टक्केही जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळेच या वेळी रब्बी हंगामात काटेपूर्णा, उमा या मध्यम प्रकल्पांसह काही लघू प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी देता आले नाही. त्यामुळेच या वर्षी रब्बीच्या पेर्‍यात घट झाली, तर आता पाणीटंचाई निर्माण हाेऊ शकते.

गाठला मृतसाठा
मोऱ्हळ, हातोला, कसुरा, तामसी, दगडपारवा, सिसा उदेगाव, सावरखेड, जनुना, घोटा, कानडी, घोंगा या ११ लघू प्रकल्पांनी मृतसाठ्याची पातळी गाठली .

मोठ्या मध्यम प्रकल्पातील जलसाठा
काटेपूर्णा १२ दलघमी
मोर्णा ८.६५ दलघमी
निर्गुणा ६.७५ दलघमी
उमा ०.२९ दलघमी