आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने केला ९८ लाखांचा भरणा; जलसंकट टळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका प्रशासनाने एक कोटी ९२ लाख रुपयांच्या थकित पाणीपट्टीपऔकी अकोला पाटबंधारे विभागाकडे ९८ लाख रुपयांच्या पाणीपट्टीचा भरणा २२ जानेवारीला केला. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे.

महापालिकेला अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याची उचल करावी लागते. एक दशलक्ष घनमीटर पाण्यासाठी दोन लाख १० हजार रुपये पाणीपट्टी आकारली जाते. वर्षाकाठी महापालिकेला १८ ते २० दलघमी पाण्याची उचल करावी लागते. त्यामुळे वर्षाकाठी ४० लाख रुपये पाणीपट्टीचा भरणा करावा लागतो.
महापालिकेने नियमितपणे पाणीपट्टीचा भरणा केल्याने पाणीपट्टीची रक्कम थकली होती. ही रक्कम एक कोटी ९२ लाख रुपयांवर पोहोचल्यावर अकोला पाटबंधारे विभागाने महापालिकेला थकित पाणीपट्टीचा भरणा केल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतरही महापालिकेने पाणीपट्टीचा भरणा केला नाही. त्यामुळे कोणत्याही वेळी पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता होती. परंतु, महापालिका प्रशासनाने थकित पाणीपट्टीपऔकी ९८ लाख रुपयांचा भरणा केल्याने पाणीपुरवठा ठप्प होण्याचे संकट तूर्तास टळले आहे.