आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील सहा प्रकल्पांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक, उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेला डोकेदुखी ठरलेली अकोला पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यावर चर्चा करण्यासाठी २० जानेवारीला मुंबई येथे बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, पाणीपुरवठामंत्री या बैठकीला उपस्थित राहू शकल्याने ही बैठक तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. २९ अथवा ३० जानेवारीला ही बैठक होण्याची शक्यता आहे.

अकोला पाणीपुरवठा योजना महापालिकेने २००६ पूर्णपणे ताब्यात घेतली होती. मात्र, ही योजना महापालिकेसाठी डोकेदुखी ठरली. महापालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने योजना चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळेच ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, असा प्रस्ताव महासभेने घेतला होता. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ११ कोटी ८४ लाख रुपयांचा निधीही महापालिकेने देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या अनुषंगाने चर्चा सुुरू आहे. या चर्चेला २० जानेवारीला मूर्त रूप येण्याची शक्यता होती. बैठकीला महापौर, उपमहापौर, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांना बोलावण्यात आले होते. मात्र, पाणीपुरवठामंत्री बैठकीला उपस्थित राहू शकल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. पुढील बैठकीची तारीख निश्चित झाली नसली तरी २९ किंवा ३० जानेवारीला ही बैठक होण्याची शक्यता आहे.