आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील जलसाठय़ांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत झाली दुपटीपेक्षा जास्त वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विदर्भातील जलसाठय़ांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अमरावती विभागातील जवळपास सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पात जवळपास 80 टक्के जलसाठा आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अल्प प्रमाणात जलसाठा आहे. मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये नागपूर विभागातील 366 प्रकल्पांमध्ये केवळ 24 टक्के जलसाठा होता. या प्रकल्पांमध्ये सध्या 65 टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागातील 376 प्रकल्पांमध्ये मागील वर्षी 23 टक्के जलसाठा होता. यावर्षी हा जलसाठा 56 टक्के झाला आहे. राज्यातील इतर चार प्रादेशिक विभागातील प्रकल्पांच्या जलसाठय़ातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, नाशिक विभागातील 350 प्रकल्पांमध्ये केवळ 22 टक्के जलसाठा आहे.

बुलडाण्यातील प्रकल्पांत अल्प पाणी
बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, नळगंगा व खडकपूर्णा या तीनही प्रकल्पांमध्ये अजूनही जलसाठा अल्प प्रमाणात आहे. मेहकर व चिखलीसारख्या मोठय़ा तालुक्यांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. मात्र, अजूनही या प्रकल्पात अल्प जलसाठा असल्यामुळे भविष्यात पाणी प्रश्‍न भेडसावू शकतो.

मराठवाड्यात केवळ 12 टक्के जलसाठा
मराठवाड्याला यावर्षी सर्वात जास्त दुष्काळाच्या झळांचा सामना करावा लागला. मागील वर्षी मराठवाड्यातील 803 प्रकल्पांमध्ये केवळ सहा टक्के जलसाठा होता. या जलसाठय़ात यावर्षी दुपटीने वाढ झाली आहे. या जलसाठय़ांमध्ये अजून वाढ होणे गरजेचे आहे.