आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पाणी तुटवडा निवारा, रचना, म्हाडा कॉलनी, नायगावात आज पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरातील पाणीपुरवठा 21 ते 24 जानेवारी या कालावधीत बंद राहणार आहे. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील एअर सर्किट ब्रेकर दुरुस्ती झाल्यानंतर झोननिहाय पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे उद्या ज्या भागात पाणीपुरवठा होईल, त्या भागात आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे ज्या भागात पाणीपुरवठा आज होणार आहे, त्या भागातील नागरिकांनी आठ ते नऊ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करण्याची गरज महापालिका जलप्रदाय विभागाने व्यक्त केली आहे.

पर्यायी व्यवस्था करावी
अनेकांना पाणी साठवणूक करण्याची सोय करणे शक्य झाले नाही. त्यांच्यासमोर आठ दिवस पाणी कसे पुरवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोयच नाही केवळ अशाच ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाची सोय करण्याची गरज नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी सार्वजनिक बोअर आहे, तिथे त्याचा वापर करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा
ज्या ठिकाणी या पाण्याच्या मेगा ब्लॉकच्या काळात प्रशासनाला पाणीपुरवठा करणे शक्य नाही, त्या ठिकाणी सामाजिक संस्थांनी पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शेजार्‍यांनी गरजूंना पाणी दिल्यास पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण होणार नाही.

राजकीय नेत्यांचा दबाव नको
महान येथील एअर सर्किट ब्रेकरच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे. हा पाणीपुरवठा शेवटच्या टोकापर्यंत होण्याची गरज आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांद्वारे होत आहे.

केशवनगर जलकुंभ - निवारा कॉलनी, सरस्वतीनगर, टेलिकॉम कॉलनी, गणेशनगर, विद्युत कॉलनी, आसरा कॉलनी, मित्रशक्तीनगर, बसेरा कॉलनी, कपिलानगर, कपिलवस्तूनगर, आझाद कॉलनी, उपाध्येनगर, परिवार कॉलनी नं. 1, सिद्धिविनायकनगर, आरटीओ रोड, गिरीनगर, नित्यानंदनगर, गौतमनगर, मयूर कॉलनी, माधवनगर.

आदर्श कॉलनी जलकुंभ - माधवनगर, रचना कॉलनी, रिद्धिसिद्धीनगर, गणेशनगर, विजय हाउसिंग सोसायटी, ओम सोसायटी, निवारा कॉलनीचा काही भाग, सहकारनगर, दत्त कॉलनीचा भाग.
महाजनी जलकुंभ - चवरे प्लॉट, सोनी कॉलनी, जुने रामनगर, म्हाडा कॉलनी.
तोष्णीवाल जलकुंभ - कृषिनगर, पंचशीलनगर, भीमनगर, इंदिरानगर, गोकूळ कॉलनी.
स्टेशन जलकुंभ - अकोटफैल, देशमुख फैल, नायगाव.

बसस्टँड जलकुंभ - मोहंमद अली रोड, इराणी झोपडपट्टी, काश्मीर लॉज परिसर, लाल बंगला, फुलारी गल्ली, बैदपुरा, खंगरपुरा, मोमीनपुरा, कोठडी बाजार, किराणा बाजार, सराफा बाजार, जुना भाजी बाजार, कलाल चाळ, पिंजारा गल्ली, जैन मंदिर भाग, दक्षतानगर, व्यापारी संकुल, दक्षतानगर वसाहत, कैलास टेकडीचा भाग तसेच आकाशवाणीच्या मागील काही भाग, अमानखाँ प्लॉट, रणपिसेनगर, रतनलाल प्लॉट, आंबेडकरनगर, केडियानगर, रामनगरचा भाग, व्हीएचबी कॉलनी, पत्रकार कॉलनी.