आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात खंडित विजेचा पाणीपुरवठय़ाला झटकाwater supply issue at akola,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पाण्याच्या मेगाब्लॉकनंतर आज झोन-2 मध्ये पाणीपुरवठा होता. मंगळवारी, 28 जानेवारीला झोन-3 मध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पण, आज वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला. त्या ठिकाणी अतिरिक्त वेळ पाणीपुरवठा करण्यात नगरसेवकांनी दबाव आणला. यासर्व प्रकारामुळे शहरातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज झोन-2 मध्ये पाणीपुरवठा होता. पण, या भागातील नागरिकांना खंडित वीजपुरवठा झाल्याने मोठा झटका बसला. नागरिकांना मोटर लावून पाणी ओढण्याची सवय आहे. त्यामुळे अनेक भागांतील नागरिकांनी ओरड करत पाणीपुरवठा अधिक काळ सुरू ठेवण्याची मागणी केली. महापालिका पाणीपुरवठा विभागाने नियमानुसार पाणीपुरवठा केला असला, तरी काही नगरसेवकांनी अधिकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी जलप्रदाय विभागाच्या अधिकार्‍यांवर दबाव आणला.

महापालिकेने ज्या भागात आज पाणीपुरवठा केला त्या भागात महावितरणने आज तांत्रिक दुरुस्तीचे काम काढत वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे सकाळपासून पाणीपुरवठा झाला असला, तरी विजेअभावी नागरिकांना विशेषत: अपार्टमेंटमध्ये राहणार्‍यांची मोठी अडचण झाली. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांना पाणीपुरवठा वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव आणत पाणीपुरवठय़ाच्या वेळेत बदल करण्यासाठी प्रयत्न केले.

मोटार जप्तीची मोहीम राबवणे आवश्यक : महापालिका पाणीपुरवठा करत असताना काही ठिकाणी नागरिकांद्वारे मोटारद्वारे पाणी खेचण्यात येते. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये मोटारद्वारा पाणी खेचले जात असल्याने जलवाहिनीच्या शेवटच्या टोकावर पाणीपुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत तिथे असलेल्या नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे महापालिका जलप्रदाय विभागाने नागरिकांच्या मोटार जप्तीची मोहीम राबवण्याची गरज नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे.