आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता होणार चार दिवसांआड पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काटेपूर्णा प्रकल्पात 15 जुलैपर्यंत आरक्षित असलेल्या 14.45 दशलक्ष घनमीटर पाण्याची पूर्ण उचल जून मध्येच झाल्याने तसेच संपूर्ण जून महिन्यात पावसाने दांडी मारल्याने भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करता यावा, यासाठी पाणी पुरवठय़ात एक दिवसाने वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील आरक्षित पाण्याची पूर्ण उचल केल्याचे वृत्त ‘दैनिक दिव्य मराठी’ने 30 जूनच्या अंकात प्रकाशित करुन प्रशासनाचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले होते.
काटेपूर्णा प्रकल्पात शहरासाठी 20 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले होते. यापैकी 15 जुलै पर्यंत 14.45 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित होते. मनपाने दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर मार्च महिन्यापासून काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याची अधिक उचल केली गेली. त्यामुळे हा आरक्षित जलसाठा 15 दिवसा आधीच संपला. तर दुसरीकडे संपूर्ण जून महिन्यात पावसाने दांडी मारली. काटेपूर्णाच्या जलसाठय़ात एक सेंटीमीटरनेही वाढ झालेली नाही. आता चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन ते तीन दिवसात केली जाईल.
फोटो - डमी पिक