आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवारस जलकुंभ अन् मनपाची अनास्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाणी वितरणातील अडचणी त्वरित सुटाव्यात, या हेतूने आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी झोननिहाय पाणीपुरवठय़ाचे नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक झोनमध्ये होणार्‍या पाणी वितरणादरम्यान झोनल अधिकार्‍यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. तर, तांत्रिक दुरुस्तीची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंत्यांकडेच राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. टेलएंड (शेवटच्या भागाला) पाणीपुरवठा होत नाही. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. तर, दुसरीकडे प्रत्येक भागातील अडचणी सोडवण्याची जबाबदारी शहर अभियंता व कार्यकारी अभियंत्यांवर येऊन पडली आहे. नुकताच परवानगी न घेता व्हॉल्व्ह उघडण्याच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे अभियंत्यावर कामाचा ताण वाढला आहे. यासाठी आयुक्तांनी झोननिहाय पाणीपुरवठय़ाची जबाबदारी झोनल अधिकार्‍यांकडे सोपवली आहे. ज्या झोनमध्ये पाणीपुरवठा असेल त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत आहे का? कोणत्या भागाला पाणीपुरवठा झाला नाही? या बाबी तपासण्याची जबाबदारी झोनल अधिकार्‍यांकडे येणार आहे. झोनल अधिकारी यासाठी कर्मचारी नियुक्त करणार आहेत.
ऴऴपाणीपुरवठा सुरू असताना मुख्य जलवाहिनीवर अवैध नळजोडण्या कुठे आहेत? नागरिकांनी नळांना तोट्या लावल्या आहेत की नाही?आदींची तपासणीही केली जाणार आहे.

अवैध नळजोडणीसाठी तीन पथके
प्रशासनाने अवैध नळजोडणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाला दिवसभरात किती अवैध नळजोडण्या शोधल्या, किती दंडात्मक कारवाई केली, याचा अहवालही दररोज द्यावा लागणार आहे.
तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून पाणी वितरणादरम्यान मोठय़ा प्रमाणात तक्रारी येत आहेत. एकाच वेळी अनेक तक्रारी येतात. या तक्रारी दूर करताना अडचणी येतात. त्यामुळे तक्रारींचा निपटारा करता येत नाही. यासाठीच आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांवर जबाबदार्‍या निश्चित केल्या आहेत. प्रशासनाला या उपाययोजनांमुळे तक्रारी दूर होतील, अशी अपेक्षा आहे. - अजय गुजर, शहर अभियंता, महापालिका, अकोला