आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी चोरी प्रकरणात 26 जणांवर कारवाईची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाणी चोरी प्रकरणात जुने शहर पोलिसांनी 26 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून 22 जुलैला पंचनामे केले. एकाच वेळी 26 पंचनामे करावे लागल्याने संपूर्ण दिवस पंचनाम्यात गेला. त्यामुळे या प्रकरणात पुढील कारवाई 23 जुलैला होण्याची शक्यता आहे. जुने शहर पोलिसांनी पाणी चोरी प्रकरणात यापूर्वी दहा जणांना अटक केली होती. ‘दिव्य मराठी’ने 22 जुलैला प्रकाशित केलेल्या या वृत्तामुळे अवैध नळजोडणीधारकांमध्ये खळबळ उडाली होती.

प्रशासनाने 16 जुलैनंतर पुन्हा एकदा अवैध नळजोडणी शोधमोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सुनील वाघ, पंचफुला गुडदे, अशोकसिंह गौरताल, सुशील वाघ, जय राठोड, अनिल गौरवाल, मुजाहितभाई, महंमद उमर महंमद जफर, करीम खान रहीम खान, अब्दुल कुद्दूस, शेख रहीम अब्दुल रहमान, शहनाबी शेख इमाम, शेख नासीर शेख कालू, बालीभाई, कादर कुरेशी, मरहिनबी लालखा, सईद अहमद, शकिलाबी अब्दुल गनी, अब्दुल रफीक अब्दुल सलाम, अमिनाबी शेख बशीर, शबाना परविन शेख सलीम, मेहरुन्नीसा शेख सलीम, महंमद शकील महंमद इक्बाल, जमिलाबी शेख, महंमद वखार पेंटर, खुर्शिदबी मोहमोद्दीन यांच्यावर पाणी चोरीप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात महापालिका अधिनियम कलम 194-2 (अ), भारतीय दंड विधान संहिता कलम 277 तसेच कलम 379, 425, 430, 431, 268, 269 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. जुने शहर पोलिसांनी या प्रकरणात 22 जुलैला सर्व घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पाणी चोरी प्रकरणात या 26 जणांवर 23 जुलैला कारवाई होण्याची शक्यता पोलिस तसेच महापालिका प्रशासनाच्या सूत्रांनी व्यक्त केली.
यानंतरही फौजदारीचा सपाटा सुरूच राहील
प्रशासनाने यापूर्वीही अवैध नळजोडणीधारकांना 15 दिवसांची संधी दिली होती. ही संधी अद्यापही सुरूच आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी होर्डिंग्ज लावून नळजोडण्या वैध करण्याचे आवाहनही केले आहे. परंतु, प्रशासनाच्या वतीने अवैध नळजोडणी प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच राहील.’’ दयानंद चिंचोलीकर, उपायुक्त, महापालिका अकोला.