आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खदान परिसरामध्ये आढळले १११ खंजीर, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील खदान परिसरातील एका व्यक्तीच्या घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) टाकलेल्या छाप्यामध्ये नियमबाह्यरीत्या ठेवलेले १११ खंजीर आणि सुरे आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची बाजारभावाप्रमाणे ११ हजार रुपयांपेक्षाही अधिक किंमत आहे. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील संजयसिंग अजबसिंग बावरी याच्या घरामध्ये नियमबाह्यरीत्या खंजीर ठेवलेले आहेत, अशी गुप्त माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून मंगळवार, २१ एप्रिलला छापा टाकला. यामध्ये बाबरी याच्या घरात तब्बल १११ खंजीर आणि सुऱ्या आढळून आल्या. त्याने ही शस्त्रे एवढ्या मोठ्या प्रमाणात कशासाठी आणली, बाबरी हा शहरात शस्त्र विक्रीचा धंदा, तर करत नसावा, करत असेल, तर त्याच्याजवळून कोणी कोणी खंजीर विकत घेतले, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून, पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. ही कारवाई एपीआय प्रकाश झोडगे यांच्या पथकाने केली.