आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजनमापांची खासगी संस्थांद्वारे पडताळणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वजनमापांमध्ये फेरफार करून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला आहे. वैधमापनशास्त्र यंत्रणेमार्फत करण्यात येणारी वजन व मापांची पडताळणी आणि मुद्रांकन आता खासगी संस्थेमार्फत केली जाणार आहे.

व्यावसायिकांकडून ग्राहकांना विविध आमिष देत फसवणूक केली जात़े अनेकदा वजनामध्येदेखील ग्राहकांना लुबाडले जात़े वैधमापनशास्त्र विभागाच्या नियंत्रकांमार्फत या गैरकामांवर नियंत्रण ठेवले जात़े हे नियंत्रण अधिक पारदर्शक होण्याकरिता केंद्रीय मंत्रालयाने जीएसआर 503 (इ) या अध्यादेशानुसार, वजनमापांची पडताळणी व मुद्रांकन करण्याची जबाबदारी खासगी संस्थांना देण्याचा अध्यादेश काढला आह़े टप्प्याटप्प्याने सर्वत्र खासगी संस्था वजन मापनासाठी काम करणार आहेत़ त्यामुळे या विभागालाही खासगीकरणाचे वेध लागले आहेत.

वैधमापनशास्त्र विभागाचे हे आहे कार्य
वैधमापनशास्त्र यंत्रणेमार्फत कायदा व त्याखालील नियमांची अंमलबजावणी करून ग्राहकांच्या हिताचे रक्षण केले जात़े त्यामध्ये प्रामुख्याने वजनात किंवा मापात माल, वस्तू कमी देणे, छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री करणार्‍या दुकानदारांवर या विभागाकडून कारवाई करण्यात येते.

संस्थांमार्फत पडताळणी
वजनमापे, टेप, दांडी, तराजू, फलक यांचे 150 किलो वजनापर्यंतच्या सर्व यंत्रणांची तपासणी खासगी संस्था करतील़ त्याकरिता इंजिनिअर व भौतिकशास्त्र विभागाचे पदवीधर सरकारकडे परवान्यासाठी अर्ज करू शकतात.