आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहीर खचल्याने एक ठार, तीन जण गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शिटाकळी - तालुक्यातील निंबी शेत शिवारात विहीर खोलीकरणाच्या कामादरम्यान विहिरीची कडा खचल्याने विहिरीत काम करणाऱ्या चार मजुरांपैकी एक जण ठार झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी वाजता घडली. जखमींवर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. आत्माराम करवते (वय ४५) असे मृतकाचे नाव आहे.
बार्शिटाकळीपासून १६ किमी अंतरावरील निंबी शेलका या गावाला लागूनच असलेल्या संजय तिवारी यांच्या शेतामध्ये विहिरीतील गाळ काढून खोलीकरणाचे काम सुरू होते. हे काम गावातीलच गौतम करवते यांनी घेतले होते. त्यांच्यासोबत आत्माराम करवते, यशवंत करवते, वसंता इंगळे हे काम करत होते. आज सकाळी ८.३० वाजता हे चौघेही काम करण्यासाठी विहिरीत उतरले होते. विहिरीच्या तळाशी काम सुरू असताना वाजताच्या सुमारास विहिरीची एका बाजूची दगडाची कडा या चौघांच्याही अंगावर कोसळली. त्यामध्ये आत्माराम करवते गौतम करवते हे गंभीर जखमी झाले, तर वसंता इंगळे यशवंत करवते यांनाही दुखापत झाली. विहिरीत कडा काेसळण्याचा त्यात असलेल्या मजुरांचा ओरडण्याचा आवाज आल्यावर शेतामध्ये काम करणाऱ्या अन्य मजुरांनी विहिरीकडे धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी गावात जाऊन नागरिकांना माहिती दिली.

त्यानंतर गावातील नागरिकांनी धाव घेतली. दोराच्या साहाय्याने काही नागरिक विहिरीत उतरले त्यांनी मलबा बाजूला करत चौघांनाही विहिरीबाहेर काढले. त्यानंतर चारही जखमींना अकोला येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आत्माराम करवते यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बार्शिटाकळीचे प्रभारी ठाणेदार भास्कर तवर, पंचायत समिती बीडीओ तहसीलदार घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेमुळे दिवसभर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
बातम्या आणखी आहेत...