आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वच्छ अकोला’ला उदंड प्रतिसाद, प्लास्टिकमुक्तीचा संकल्प फळाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मकर संक्रांत हा महिलांच्या जिव्हाळ्याचा सण. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून त्या उत्साहाने हा सण साजरा करत आहेत. दिव्य मराठीने आयोजित केलेल्या टॉक शो मध्ये परंपरागत वाण लुटण्याची प्रथा बदलणार काय, असा प्रश्न विचारला तेव्हा अकोलेकर महिलांनी प्लास्टिकमुक्तीसारख्या संकल्पाचे वाण लुटण्याचा निर्धार केला.
शहरातील अनेक महिलांनी या विचाराचे स्वागत केलेे. विविध महिला आणि त्यांच्या संस्था त्यासाठी पुढाकार घेत आहेत. अशोकनगर येथील समता समुदाय विकास संस्थेने आज घेतलेल्या हळदी-कुंकू समारंभाने बचत गटांनी तयार केलेल्या पिशव्यांचे वाण लुटत आदर्श निर्माण केला. शारदा समाज मंडळ अक्षरा ग्रुपच्या महिलांनी परिसंवादाचे आयेाजन केले. तर स्वामिनी विधवा विकास मंडळाने विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, प्रौढ कुमारिकांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेतला. ऋग्वेदी ब्राह्मण मंडळाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. तर भावसार समाजातील महिलांनी होतकरू मुलांसाठी लुटीचे आयोजन करून कापडी पिशव्यांचे वाण लुटले.बहुउद्देशीय मंडळ भिशी ग्रुपच्या महिलांनी परिसरातील कचरा गोळा केला.