आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी विहीर घोटाळा; तक्रारकर्त्यास धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बोरगावमंजू येथील सिंचन विहिरी कामासंबंधी प्राप्त झालेल्या हजेरी पत्रकांमध्ये त्रुट्या, विसंगती आढळून आल्या आहेत. येथीलच ८५ हजेरी पत्रके बनावट असल्याचा अहवाल तांत्रिक अधिकाऱ्याने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रकरणात हात ओले करणाऱ्याचे पित्त खवळले, त्यांनी तक्रारदारावर दबाव आणून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत बनावट सिंचन विहिरी दाखवून, त्याचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न सुरू अाहे. सिंचन विहिरीच्या कामाची तपासणी करण्याकरिता तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत असते. हा तांत्रिक अधिकारी सिंचन विहिरीच्या कामाचा अहवाल तयार करतो आणि तो पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सुपूर्द करत असतो. मात्र, बोरगावमंजू परिसरात सुरू असलेल्या सिंचन विहिरीच्या कामामध्ये हेराफेरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तांत्रिक अधिकारी नरेश शिरभाते यांनी सुरुवातीला अकोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एस. बुचटे यांना अवगत केले. त्यांनी दखल घेतली नाही, उलट त्यांचीच तक्रार मंगळवारी सीईओंनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये करून त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी सीईओ यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता बीडीओंना धारेवर धरले होते.

खोटी बिले काढण्यासाठी दबाव
तांत्रिकअधिकारी नरेश शिरभाते यांच्यावर सिंचन विहिरींची बिले काढण्यासाठी दबाव येत आहे आपल्या जीवाला धोका असून, आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप करत शिरभाते यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...