आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम महाराष्ट्रातील खिळखिळ्या बसेस विदर्भात; नेते अनभिज्ञ, प्रवाशांचा जीव धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पश्चिम महाराष्ट्रातील एसटी आगारामध्ये सुमारे 100 नवीन व्हॉल्वो बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणच्या अतिरिक्त झालेल्या खिळखिळ्या बसेस विदर्भातील आगारांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. आता ह्या बसेस विदर्भातील रस्त्यांवरून धावणार आहेत. या बसेसमुळे विदर्भातील प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने राज्य परिवहन महामंडळात तब्बल 100 नवीन व्हॉल्वो बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणच्या जास्तीच्या बसेस विदर्भातील नागपूर व अमरावती राज्य परिवहन महामंडळात पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये अमरावती प्रादेशिक मंडळात 50 व नागपूर प्रादेशिक मंडळात 50 अशा एकूण 100 खिळखिळ्या बसेस विदर्भात धावणार आहेत. मागील वर्षीसुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील खराब झालेल्या बसेस विदर्भात पाठवण्यात आल्या होत्या. विदर्भातून सर्वाधिक महसूल महामंडळाला मिळत असतानादेखील खिळखिळ्या झालेल्या बसेस विदर्भाच्या माथी मारण्यात आल्या आहेत. या बसेसमुळे अपघाताच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नादुरुस्त बसेस रस्त्यावर : यामधील अनेक बसेस नादुरुस्त आहेत. गेअरबॉक्स व इतर तांत्रिक अडचणी असल्यामुळे चालकांना बस चालवताना मोठय़ा अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये काही चालकांनी तक्रारी केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.

महामंडळाला जाब विचारणार

4पश्चिम महाराष्ट्रातील खिळखिळ्या झालेल्या बसेस विदर्भात पाठवण्याचा निर्णय महामंडळाचा आहे. असे असेल तर राज्य परिवहन महामंडळाला जाब विचारणार आहोत. वेळप्रसंगी आपण यासंदर्भात येणार्‍या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करू.’’ बच्चू कडू, आमदार, अचलपूर विधानसभा मतदारसंघ

एसटी बसेस आगारात दाखल
पश्चिम महाराष्ट्रातील काही खिळखिळ्या बसेस अमरावती प्रादेशिक विभागात दाखल झाल्या आहेत. बसेस खिळखिळ्या असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. या बसेस परत पाठवण्यात याव्या यासाठी पाठपुरावादेखील करण्यात येत आहे.’’ प्रशांत भुसारी, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, अकोला.