आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपवरील संवादाचा बॅकअप आता गुगल ड्राइव्हवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपवरील संवादाचा बॅकअप गुगल ड्राइव्हवर घेता यावा, याबाबत युजर्सकडून मागणी सुरू होती. युजर्सची वाढती मागणी लक्षात घेता व्हॉट्सअॅपने संवादाचा बॅकअप गुगल ड्राइव्हवर घेण्याची सुविधा सुरू केली आहे. यासाठी व्हॉट्सअॅपचे v2.12.45 हे नवीन व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. नंतर चॅट सेंटिंगमधील बॅकअप टू गुगल ड्राइव्ह हा पर्याय निवडावा. त्यानंतर ही सुविधा सुरू होईल.