आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Whole Akola District Suffered 200 KM Hole On Road

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिवृष्टीमुळे अकोला जिल्हय़ात 200 कि.मी. रस्त्यावर खड्डेच खड्डे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हय़ात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत असलेल्या रस्त्यांपैकी सुमारे 200 किलोमीटर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अतिवृष्टीमुळे हे नुकसान झाले असून, या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी जवळपास दोन कोटींची गरज आहे. जिल्हय़ातील 151 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे नवीनीकरण करावे लागणार आहे. लहान पूल, रस्त्याचा व पुलांचा पोहोच मार्ग, गटारांची दुरुस्ती करावी लागणार आहे. अतिवृष्टीमुळे कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 62 कोटींची गरज भासणार आहे.

जिल्हय़ातील प्रमुख राज्य मार्गांपैकी पाच किलोमीटर लांबीच्या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. जिल्हय़ातील 123 किलोमीटर लांबीचा रस्ता बाधित झाला आहे. प्रमुख जिल्हा मार्गापैकी 71 किलोमीटर लांबीचा रस्ता प्रभावित झाला आहे. असे एकूण 200 किमी लांबीचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत.


तालुकानिहाय नुकसान
तालुका राज्य मार्ग जिल्हा मार्ग
अकोट 22 किमी. 30 किमी.
तेल्हारा 14 किमी. 02 किमी.
मूर्तिजापूर 16 किमी. 14 किमी.
बार्शिटाकळी 07 किमी. 03 किमी.
बाळापूर 19 किमी. निरंक
पातूर 18 किमी. 06 किमी.
अकोला 27 किमी. 16 किमी.
एकूण 123 किमी. 71 किमी.


62 कोटींची मागणी
पावसामुळे जिल्हय़ातील मार्गांची स्थिती खराब झाली आहे. खड्डे, रस्त्यांचे नवीनीकरण, नाले, गटार, लहान पूल यांच्या निर्मितीसाठी व दुरुस्तीसाठी 62 कोटींची गरज असून, शासनाकडे त्याची मागणी केली आहे. सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.