आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूंच्या उत्सवातच दंगली का होतात?, शिवसेना आमदार दिवाकर रावतेंचा सवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पातूर (जि. अकोला) येथे सोमवारी कावड यात्रेदरम्यान झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी रावते यांनी ‘साहेब, आपल्या काळात दंगली वाढल्या, हिंदूंच्याच उत्सवात दंगली कशा होतात?’ असा प्रश्न पोलिस अधीक्षकांना विचारला.

पातूर येथे गाडी उभी करण्याच्या वादातून झालेल्या दंगलीमध्ये सुमारे 13 जण जखमी झाले. कावड उत्सवाला गालबोट लागल्यामुळे भाविक संतप्त झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अर्शुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, रावते यांनी घटनास्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी अरुण शिंदे व पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांच्याशी चर्चा केली. ‘हिंदूंच्या उत्सवातच दंगली का भडकतात? साहेब, कठोर निर्णय घ्या, कायदेशीर कारवाई करा’, अशी मागणी त्यांनी केली. गणेशोत्सवात तरी असे प्रकार होऊ नयेत, असे आमदार संजय गावंडे म्हणाले.