आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्यप्राणी प्रगणना होणार २३ पासून सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वन्यजीव अभयारण्य, राखीव वनक्षेत्रातील वाघ तसेच इतर मांसभक्षी प्राण्यांचे अस्तित्व, वावर संख्येबाबत अंदाज, तृणभक्षी प्राण्यांची विपुलता, अधिवास क्षेत्राची गुणवत्ता आदींची आकडेवारी मिळवण्यासाठी १५ ते २३ जानेवारीदरम्यान ट्रॉन्सेक्ट लाइन पद्धतीने वन्यप्राणी प्रगणना करण्यात येत असून, अकोला वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत असलेल्या काटेपूर्णा ज्ञानगंगा अभयारण्यातही प्रगणना सुरू झाली आहे.

प्रादेशिक, वन्यजीव तथा वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वनांमध्ये नियतक्षेत्र घटक म्हणून या पद्धतीने दिवसांत प्रगणना करण्यात येत आहे. यामध्ये प्रपत्र मध्ये वाघ, बिबट इतर मांसभक्षी प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणांची नोंद घेतात. प्रपत्र मध्ये लाइन ट्रॉन्सेक्टवर तृणभक्षी प्राण्यांची नोंद घेण्यात येते, तर प्रपत्र अ, मध्ये वनस्पतींची तसेच मानवी हस्तक्षेपांची नोंद घ्यावयाची असते. प्रपत्र मध्ये तृणभक्षी प्राण्यांच्या विष्ठेची, लेंड्याची नोंद घेतात, तर राज्यातील गिधाडांच्या अस्तित्वाविषयी जाणून घेण्यासाठी प्रपत्र मध्ये त्यांचे सर्वेक्षण नोंदवायचे आहे. प्रगणनेदरम्यान, फिरताना वाघ, बिबट, रानकुत्रा यांच्या पाऊलखुणा, विष्ठा, ओरखडे, अंग घासल्याच्या खुणा, गंध, बसण्याच्या, लोळण्याच्या जागा, प्रत्यक्ष पाहणी, आवाज आदींच्या नोंदी घेण्यात येतील. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ११ १२ जानेवारीला प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अकोला वन्यजीवचे उपवनसंरक्षक विजय गोडबोले यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक रमेशप्रसाद दुबे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. पुयाड, भगत यांच्या मार्गदर्शनात प्रगणना सुरू आहे.