आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू स्वास्थ्याला धोकादायकच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिन विशेष -अकोला | दारूचेपरिणाम दारू पिणाऱ्यावरच नाही तर त्याच्या कुटुंबावरही होतात. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यामुळे प्रशासकीय सामाजिक पातळीवर "संपूर्ण जिल्हा दारूमुक्त' होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यसनमुक्ती चळवळीतील तज्ज्ञांनी व्यक्त केले. २६ जून रोजी मादक पदार्थ विरोधी दिन पाळल्या जातो. त्यानिमित्त मानसोपचार तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया.

^दारूअत्यंत वाईट व्यसन आहे. जी व्यक्ती पूर्णपणे दारूच्या आहारी गेली असेल त्या व्यक्तीला सारखे विसरायला होते. त्यामुळे निर्णय घेता येणे, आत्महत्येला प्रवृत्त होणे, अति दारू पिण्यामुळे बेशुद्धावस्थेत जाणे त्यानंतर मृत्यू, असे दुष्परिणाम होऊ शकतात.'' डॉ.नवीन तिरुख, मानसोपचार तज्ज्ञ

स्लो सुसाइड
^दारूमुळेसंबंधित व्यक्ती स्लो सुसाइड म्हणजेच, दररोज हळूहळू आत्महत्या करत असतो. आज दारूचे प्रमाण लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाढत आहे. दारूमुळे स्वत:ला कुटुंबाला वेळ देता येत नाही. केसापासून तर पायाच्या नखापर्यंत इजा पोहोचते. त्यामुळे या व्यसनापासून प्रत्येकाने स्वत:ला जोपासले पाहिजे.'' डॉ.प्रमोद ठाकरे, मानसोपचार तज्ज्ञ
संसार उद्ध्वस्त
दारूव्यसनामुळे किती भयानक मृत्युकांड होऊ शकते. हे मंुबईच्या मालवणी प्रकरणावरून लक्षात आलेेे. हे भयानक प्रकार भविष्यात टाळण्यासाठी राष्ट्रसंत विचार साहित्य सेवा समितीच्या वतीने "अकोलाच नव्हे, तर संपूर्ण राज्य दारूमुक्त व्हावे', ही मागणी करत आहे.'' रामेश्वरबरगट, सचिव
बातम्या आणखी आहेत...