आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोचर्‍या थंडीला सुरुवात; तापमान 11 अंशांपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - काही दिवसांपूर्वी कमी झालेले थंडीचे प्रमाण वाढले असून, बोचर्‍या थंडीला सुरुवात झाली आहे. शनिवारी शहराचे तापमान 11.5 अंश सेल्सियसवर आल्यामुळे वातावरणातील गारवा जाणवला. मागच्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबरच्या सुरुवातीलाच थंडीचा जोर जास्त आहे. शहराचे 4 डिसेंबरचे तापमान 20.4 अंशांवरून 14.3 अंशांवर आले. तापमानात झालेल्या या घसरणमुळे 6 डिसेंबरला सायंकाळपासूनच वातावरणात गारवा जाणवत होता.

शनिवारी मात्र पारा 11.5 अंश सेल्सियसवर आल्याने दिवसभर हलक्या प्रमाणात गारवा होता. रात्रीसुद्धा अंगावर काटा आणणारा वारा होता. दोन दिवसांपासून अचानक थंडीने जोर धरला आहे. त्यामुळे शहरात सायंकाळनंतर रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.दिवसभर स्वेटर घालणारे अनेकजण दिसत आहेत. दोन वर्षांपासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान एवढे कमी झाले नव्हते. या वर्षी मात्र महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी वाढली आहे. त्यामुळे अजून तापमान किती कमी होईल, याचा अंदाज नाही.