आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Licence Drive Motor Ten Thousand Penalty At Akola

लायसन नसल्‍यास 10 हजार रुपयांचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता मोटार वाहन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्याच्या नियमात १० पट अधिक कठोर नियम करण्यात आल्यामुळे आता विनापरवाना वाहन चालवल्यास १० हजार रुपये दंड, कागदपत्र नसल्यास पाच हजार रुपये दंड चालकाला मोजावा लागणार आहे.
केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायद्यावर नुकत्याच हिवाळी अधिवशनात मोहोर उमटवली आहे. यापूर्वीच वाहतुकीसाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहन कायद्यात बदल करण्याचे जाहीर केले होते. या कायद्यानुसार वाहनाचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. चालक परवाना नसताना वाहन चालवणाऱ्यांना दहा हजार रुपये, धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास अडीच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच रुग्णवाहिकेसह अन्य आपत्कालीन वाहनास रस्ता दिल्यास पाच हजार रुपये, विनानोंदणी वाहनास २५ हजारांचा दंड विनानोंदणी वाहन वापरल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि दुसऱ्यांदा आढळून आल्यास ५० हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच, संबंधित वाहन डिलरला एक लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच वाहनाचा विमा नसल्यास दुचाकीस २५ हजार रुपये दंड, मद्यपी चालकास सहा महिने कैद, मद्यपी वाहनचालकास १५ हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
*स्कूल बसचा चालक दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास ५० हजार रुपये दंड, तीन वर्षांचा कारावास
*१८ ते २५ वर्षे वयोगटातील चालक असेल,
*परवाना तडकाफडकी रद्द करण्याची तरतूद आहे. काही परिस्थितीत बालकाचा मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये दंड
*किमान सात वर्षे कारावासाची शिक्षा असेल.
*तीन वेळा सिग्नल तोडल्यास १५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.